प्रकाशा येथील वृद्धाश्रमातील वृद्धांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:36 IST2021-09-04T04:36:47+5:302021-09-04T04:36:47+5:30
आरोग्य तपासणीत वृद्धाश्रमातील ६० वृद्धांची मधुमेह, ईसीजी व रक्तदाब तपासणी करण्यात आली. आवश्यक त्यांना मोफत औषधोपचार करण्यात आला. तसेच ...

प्रकाशा येथील वृद्धाश्रमातील वृद्धांची आरोग्य तपासणी
आरोग्य तपासणीत वृद्धाश्रमातील ६० वृद्धांची मधुमेह, ईसीजी व रक्तदाब तपासणी करण्यात आली. आवश्यक त्यांना मोफत औषधोपचार करण्यात आला. तसेच एक वेदनाहर ट्यूब, व्हीक्स डबी, मास्क,सॅनिटायझर, कॅल्शियम व रक्त वाढीच्या गोळ्या, आवश्यकतेनुसार पोटदुखी, सर्दी-खोकला, अंगदुखी आदी वस्तू असलेली कीट देण्यात आली. ट्रस्टचे संचालक मोहनचौधरी यांनी ग्रुपचे आभार मानले.ग्रुपचे अध्यक्ष ॲड.अल्पेश जैन यांनी गरज भासल्यास दरवर्षी वैद्यकीय पथकाद्वारे आरोग्य तपासणी केली, जाईल अशी ग्वाही दिली. डॉ.संदीप जैन, डॉ.महेश मोरे, डॉ. योगेश बडगुजर व डॉ.सुनील लोखंडे यांनी वृद्धांची आरोग्य तपासणी करुन समुपदेशन केले. देवेंद्र चव्हाण व रवी चव्हाण यांनी औषधी वाटप केली. शिबिरासाठी सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष ॲड.अल्पेश जैन, उपाध्यक्ष डॉ.संदीप जैन, सचिव डॉ.सुनील लोखंडे, कोषाध्यक्ष डॉ.योगेश बडगुजर, सहसचिव डॉ.महेश मोरे, गुड्डू जिरे, रवी चव्हाण, महेंद्र सूर्यवंशी, सोहेल मन्सुरी, राकेश भोई, देवेंद्र चव्हाण, राहूल पाटील, प्रमोद जहांगीर आदींनी परिश्रम घेतले. ग्रुपच्या सदस्यांनी आरोग्य तपासणीनंतर वृद्धांसोबत स्नेहभोजन केले.