सुरक्षित माता दिनानिमित्त आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 13:00 IST2019-06-10T13:00:30+5:302019-06-10T13:00:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मोलगी : धडगाव तालुक्यातील मांडवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व दिनानिमित्त गरोदर माता तपासणी ...

Health check-up on the day of safe mother day | सुरक्षित माता दिनानिमित्त आरोग्य तपासणी

सुरक्षित माता दिनानिमित्त आरोग्य तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
मोलगी : धडगाव तालुक्यातील मांडवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व दिनानिमित्त गरोदर माता तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होत़े शिबिरात मातांची सोनोग्राफी व आरोग्य तपासणी करण्यात आली़  
मांडवी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ राहुल मुंडे यांनी मातांच्या तपासण्या केल्या़ यावेळी केंद्रातील वैद्यकीय कर्मचा:यांची उपस्थिती होती़  शिबिरांतर्गत आठवडाभरात 116 मातांची सोनोग्राफी तपासणी व 109 मातांची आरोग्य तपासणी करण्यात आली़ यात रक्त व लघवी तपासणी, रक्तदाब, वजन, उंची, पोटावरुन तपासणीचा समावेश होता़ शिबिरात बोलताना डॉ़ मुंडे यांनी सांगितले की, रक्तक्षय असलेल्या मातांना आरोग्य केंद्रातच दाखल करण्यात येऊन पुढील उपचार करणार येणार असून अतिदुर्गम भागात होणारे मातामृत्यू व कुपोषणातून बालमृत्यू टाळण्यासाठी विशेष प्रय} केले जाणार आहेत़ 
मांडवी येथील आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत पुरुष नसबंदींच्या 338 शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात कोणत्याही आरोग्य केंद्राने आजवर केलेल्या या सर्वाधिक शस्त्रक्रिया आहेत़धडगाव तालुक्याच्या विविध भागात ब:याच माता घरीच प्रसूत होतात, यातून त्यांच्या जिवालाही धोका निर्माण होतो़ यामुळे या मातांना आरोग्य केंद्रात दाखल करुन त्यांच्या जिवाचा धोका कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सप्ताहादरम्यान सांगण्यात आल़े 
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ नितीन बोडके, माता बाल संगोपन अधिकारी डॉ़ एऩएल़बावा, मांडवी नोडल अधिकारी डॉ़ शिवाजी राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ दिनेश बडे यांच्या मार्गदर्शनात हा सप्ताह राबवण्यात आला होता़ 
 

Web Title: Health check-up on the day of safe mother day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.