सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 12:14 IST2020-05-10T12:14:06+5:302020-05-10T12:14:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : कोरोनाला रोखण्यासाठी गेल्या दोन महिन्यापासून कार्यरत असलेल्या पालिकेच्या १०५ सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात ...

 Health check of cleaners | सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : कोरोनाला रोखण्यासाठी गेल्या दोन महिन्यापासून कार्यरत असलेल्या पालिकेच्या १०५ सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीत या कर्मचाºयांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग व तळोदा पालिकेचे सफाई कर्मचारी दोन महिन्यापासून नगराध्यक्ष अजय परदेशी, मुख्याधिकारी सपना वसावा यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील रस्ते, गटारी साफसफाई करण्यासह औषध फवारणीचे काम सातत्यने करीत आहेत. तब्बल चार ते पाचवेळा संपूर्ण शहरात फवारणी करण्यात आली आहे.
या कर्मचाºयांचे आरोग्य अबाधीत रहावे यासाठी नगराध्यक्ष परदेशी व मुख्याधिकारी वसावा यांनी आरोग्य विभागाकडे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शनिवारी पालिकेच्या कार्यालयात १०५ सफाई कर्मचाºयांची आरोग्य तपासणी करून थर्मल स्कॅनिंग करण्यात आली. या तपासणीत एकाही कर्मचाºयाला ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे आढळून आली नाहीत. एस.एस. चौरे, लीला साळवे, नरेश पावरा, विशाल चौधरी आदींनी सफाई कर्मचाºयांची आरोग्य तपासणी केली. या वेळी पालिकेचे प्रशासकीय अधिकारी विजय सोनवणे, आरोग्य निरीक्षक दिगंबर माळी, राजेश माळी आदी उपस्थित होते.

Web Title:  Health check of cleaners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.