म्हसावद येथे आरोग्य तपासणी व उपचार शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:34 IST2021-08-12T04:34:15+5:302021-08-12T04:34:15+5:30
विश्व आदिवासी दिनाचे औचित्य साधत म्हसावद येथे आशीर्वाद हॉस्पिटल येथे एकलव्य प्रतिष्ठान व डॉ.श्रीराम पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने हे ...

म्हसावद येथे आरोग्य तपासणी व उपचार शिबीर
विश्व आदिवासी दिनाचे औचित्य साधत म्हसावद येथे आशीर्वाद हॉस्पिटल येथे एकलव्य प्रतिष्ठान व डॉ.श्रीराम पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने हे आरोग्य तपासणी शिबिर झाले. शिबिरात डॉ.राजेश सूर्यवंशी (शहादा), डॉ.हेमंत भांडारकर (शहादा), डॉ.चैतन्या भांडारकर (शहादा), डॉ.मणिलाल शेल्टे (कुसुमवाडा), डॉ.श्रीराम पाटील (म्हसावद), डॉ.मुकेश मोरे (खेतिया), डॉ.गौरव चौधरी (कुढावद), गौरव ठाकरे (म्हसावद) या तज्ज्ञ डॉक्टरांनी विविध आजाराच्या रुग्णांवर मोफत उपचार करून औषधोपचार केला. यात गर्भवती व इतर स्त्रीरोग, जुनाट आजार, कोरोनानंतरचा त्रास, छातीचे त्रास, थकवा व बैचनी होणे आदी विविध आजारांवर उपचार करून मोफत औषधे रुग्णांना देण्यात आले. शिबिरात एकूण ५८६ पेक्षा जास्त रुग्णांनी सहभाग घेतला. शिबिरासाठी एकलव्य प्रतिष्ठान म्हसावदचे वैभव वळवी, प्रल्हाद शेमळे, नंदराज पाडवी, गुड्डू वळवी, अरुण पाडवी, रोहित शेमळे, विशाल ठाकरे, नीलेश शेवाळे, रोहित मोते, राहुल निकुंभ, विशाल मोरे, दीपक डमी, राजेश शेमळे, केशव ठाकरे, राहुल ठाकरे, प्रफुल पाटील, वामन वसावे, आकाश चौधरी, दिनेश ठाकरे व दिया लॅब यांनी परिश्रम घेतले.