तळोदा येथे 60 निराधार वृद्धांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 13:09 IST2019-11-02T13:08:57+5:302019-11-02T13:09:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : दिवाळीनिमित्त तळोदा येथिल सहयोग सोशल ग्रुप व नैवेद्य फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने शहरातील निराधार वृद्धांसाठी ...

तळोदा येथे 60 निराधार वृद्धांची आरोग्य तपासणी
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : दिवाळीनिमित्त तळोदा येथिल सहयोग सोशल ग्रुप व नैवेद्य फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने शहरातील निराधार वृद्धांसाठी आरोग्य तपासणी करण्यात आली. यात एकुण 60 जणांची तसापणी करीत त्यांच्यावर औषधोपचारह करण्यात आली.
ज्यांच्या नशिबी दिवसातून एकवेळचे जेवण सुद्धा नाही अश्या निराधार, गरजू व अत्यंत बिकट परिस्थितीत जीवन जणा:या तळोद्यातील 70 पेक्षा अधिक वृद्धांची नैवेद्य फाउंडेशनतर्फे एकवेळ जेवणाची व्यवस्था केली. मात्र त्यांची एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता भविष्यात त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होवू शकतो, ही बाब लक्षात घेत सहयोग सोशल ग्रुपने या वृद्धांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दिवाळीचे औचित्य साधत एक दिवसीय आरोग्य शिबीर राबविले. यावेळी 44 महिला व 16 पुरुष अश्या एकूण 60 वृद्धांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. सर्व चाचण्याही घेण्यात आल्या. त्यांच्यावर आजारानुसार मोफत औषधोपचार सुदधा करण्यात आला. यावेळी सहयोग सोशल ग्रुपचे सदस्य अॅड. अल्पेश जैन, डॉ. संदिप जैन, डॉ. योगेश बडगुजर, डॉ. सुनील लोखंडे, डॉ. महेश मोरे, डॉ. लक्ष्मीकांत चौधरी, सम्राट महाजन, यादव जिरे आदी उपस्थित होते. यावेळी गणेश पाटील, सोहेल मंसुरी, संदीप पाडवी, गणेश चव्हाण, प्रमोद मिस्त्री, नितीन पाटील, तेजस सूर्यवंशी, तुकाराम पावरा, गणेश कडोशिया, दीपक गुरव, जितेंद्र नायदे, शीतल पाटील, राहुल पाटील, रवी चव्हाण आदींनी योगदान दिले.
शिबीरासाठी उपस्थित राहिलेले वृद्ध हे सर्व निराधार असुन त्यांना सर्वस्वी मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांना मोफत चादरी देखील वाटप करण्यात आले. यासाठी स्वप्नील परदेशी यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी निराधारांना मायेची उब देण्याचा प्रय} केला. चादरी वाटप उपक्रमामुळे या निराधारांना यंदाच्या हिवाळ्यापासून स्वत:चा बचाव करता येणार आहे.