नंदुरबार येथे वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 12:39 IST2019-12-31T12:39:19+5:302019-12-31T12:39:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहर वाहतूक विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी शिबिर इंडियन मेडिकल असोसिएशन व महाराष्ट्र आदिवासी ...

नंदुरबार येथे वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिर
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहर वाहतूक विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी शिबिर इंडियन मेडिकल असोसिएशन व महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर्स असोसिएशन नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने येथील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये घेण्यात आले.
या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राजेश वळवी, सचिव डॉ.जय देसाई, डॉ.अनिकेत नागोते, डॉ.भावना गावीत, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत आदाटे उपस्थित होते. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस दलाच्या वाहतूक शाखेतर्फे विविध पॉर्इंटवर नेमलेल्या पोलीस कर्मचाºयांना रस्त्यावर उभे राहून धूळ व वाहनांचे प्रदूषण यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यासाठी त्यांच्या छाती व फुफ्फुसाची तपासणी व आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिरात ४० पोलीस कर्मचाºयांची रक्तदाब, मधुमेह , फुफ्फुस क्षमता मापन तपासणी, ईसीजी आदी तपासण्या मेडिकेअर हॉस्पिटल चे डॉ.राजेश वळवी, डॉ.भावना गावीत व सहकाºयांनी केल्या.