राष्ट्रवादी महिला व वैद्यकीय आघाडीतर्फे आरोग्य शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:11 IST2021-02-05T08:11:19+5:302021-02-05T08:11:19+5:30
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी माजी आमदार उदेसिंग पाडवी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा हेमलता शितोळे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष ...

राष्ट्रवादी महिला व वैद्यकीय आघाडीतर्फे आरोग्य शिबिर
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी माजी आमदार उदेसिंग पाडवी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा हेमलता शितोळे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार सनंसे, जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल साळी, राष्ट्रवादी जिल्हा संघटक एन.डी. पाटील, शशिकांत पाटील, शहादा तालुका अध्यक्ष माधव पाटील, शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होते. शहर व परिसरातील गरजू महिलांच्या आरोग्याची तपासणी व्हावी, त्यांचे आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महिलांच्या आरोग्यविषयक सर्व आजारांची तपासणी करण्यात आली. शहरातील धन्वंतरी हॉस्पिटल येथे झालेल्या शिबिरात डॉ. शीतल सनंसे, डॉ. दीपमाला गिरासे, डॉ. प्रेमसिंग गिरासे, डॉ. अशपाक शहा, डॉ. चंचल चौधरी, डॉ. श्रीराम पाटील, डॉ. नवीन पाटील, डॉ. किशोर अमोडकर यांनी रुग्णांची तपासणी केली. शिबिरासाठी पदाधिकारी, डॉक्टर्स व नर्स यांनी परिश्रम घेतले.