लहान शहादे येथे आरोग्य शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 12:18 IST2019-07-25T12:18:03+5:302019-07-25T12:18:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील लहान शहादे येथे महात्मा फुले ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत तपासणी ...

लहान शहादे येथे आरोग्य शिबीर
लोकमत न्यूज नेटवर्क
लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील लहान शहादे येथे महात्मा फुले ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होत़े शिबिरात परिसरातील गावांधील 200 पेक्षा अधिक रुग्णांच्या मोफत तपासण्या करण्यात आल्या़ 23 जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालयात हे शिबिर झाल़े
प्रारंभी उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुपाबाई रामा पाडवी होत्या़ उद्घाटन उपसरपंच भगवान पाटील यांच्याहस्ते करण्यात आल़े प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य आत्माराम भिल, ग्रामसेविका अर्चना चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते दिलीप कोळी, सागर चव्हाण उपस्थित होत़े शिबिरात डॉ़ अभिजीत वळवी यांनी पिवळे व केशरी कार्ड धारकांना निवडक आजारांवर निदान, उपचार आणि शस्त्रक्रिया याबाबत माहिती दिली़ नंदुरबार येथील मेडिकेअर हॉस्पिटल्समध्ये निवडक आजारांवर शस्त्रक्रिया होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितल़े शिबिरात पोटाचे गंभीर आजार, अपघातातील फ्रॅर, डोळ्यांचे आजार यासह सर्वरोगांची तपासणी करण्यात आली़ यात विविध गंभीर आजार असलेल्या रुग्णांची तपासणी करुन त्यांना पुढील उपचार आणि शस्त्रक्रियांची माहिती देण्यात येऊन त्यांची निवड करण्यात आली़ डॉ़ दिलीप वळवी, डॉ़ सुशांत बाविस्कर यांनी रुग्णांची तपासणी केली़
यशस्वीतेसाठी जवाहरलाल नेहरु विद्यालयाचे चेअरमन राजेंद्र पाटील, आरोग्यमित्र सुनिल जावरे, दिलवर गावीत, नम्रता वसावे, अभिजीत वळवी, नितीन जाधव यांनी परिश्रम घेतल़े सूत्रसंचालन पितांबर नरभवर यांनी केल़े प्रथमच लहान शहादे येथे झालेल्या या आरोग्य तपासणी शिबिरासाठी परिसरातील 15 गावांचे ग्रामस्थ उपस्थित होत़े