दुकान समोरासमोर लावण्यावरून फोडले डोके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 13:29 IST2020-11-12T13:28:58+5:302020-11-12T13:29:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुकान समोरासमोर लावल्यामुळे व्यवसाय होणार नाही याबाबत सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाच्या डोक्यात वीट टाकून ...

दुकान समोरासमोर लावण्यावरून फोडले डोके
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दुकान समोरासमोर लावल्यामुळे व्यवसाय होणार नाही याबाबत सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाच्या डोक्यात वीट टाकून जखमी केल्याची घटना ९ रोजी वफडळ्या, ता.धडगाव येथे घडली. धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, रमेश शिवाजी पावरा, रा.वडफळ्याच्या दायरापाडा, ता.धडगाव असे संशयीताचे नाव आहे तर प्रकाश खत्र्या पावरा, रा. वडफळ्या असे जखमीचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, वडफळ्या येथे प्रकाश पावरा यांच्या दुकानासमोर रमेश पावरा यांनी आपले दुकान लावले. त्यांना प्रकाश यांनी समजविण्याचा प्रयत्न केला असता त्याचा राग येऊन रमेश याने शिवीगाळ, दमदाटी करीत प्रकाश यांच्या डोक्यात वीट मारली. त्यात ते जखमी झाले.
याबाबत नातेवाईकांनी आपसात वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो न मिटल्याने प्रकाश पावरा यांनी धडगाव पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून रमेश शिवाजी पावरा यांच्याविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार जाधव करीत आहे.