लग्नात नाचण्यावरून फोडले एकाचे डोके

By Admin | Updated: May 14, 2014 00:39 IST2014-05-14T00:39:24+5:302014-05-14T00:39:24+5:30

लग्नात नाचण्यावरून एका जणाचे डोके फोडण्यात आल्याची घटना मातपूट बोराळे, ता.शहादा येथे घडली.

The head of one of the boys was shot on dance | लग्नात नाचण्यावरून फोडले एकाचे डोके

लग्नात नाचण्यावरून फोडले एकाचे डोके

नंदुरबार : लग्नात नाचण्यावरून एका जणाचे डोके फोडण्यात आल्याची घटना मातपूट बोराळे, ता.शहादा येथे घडली. पोलीस सूत्रांनुसार, याबाबतची फिर्याद रवींद्र मंगा शिंदे (वय ३०, रा.मातपूट बोराळे) यांनी दिली आहे. ११ मे रोजी सायंकाळी लग्नसमारंभात रवींद्र शिंदे हा नाचत होता. नाचत असताना त्याचा धक्का पिंटू भाईदास भिल याला लागला. याचे वाईट वाटून पिंटू व रवींद्र यांच्यात वाद झाला. यातून पिंटूने रवींद्रच्या अंगावर दगड फेकून मारला. तो दगड रवींद्रच्या डोक्याला लागला. त्यात तो जखमी झाला आहे. याशिवाय लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यावरून सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी थोरात तपास करीत आहेत.

Web Title: The head of one of the boys was shot on dance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.