मेहुण्याने फोडले शालकाचे डोके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 12:03 IST2019-05-28T12:03:11+5:302019-05-28T12:03:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सासूच्या घरासमोर शेळ्या बांधाण्याच्या वादातून मेहुणे व शालक यांच्यात हाणामारी झाली. मेहुण्याने शालकाचे डोके ...

The head of the boy shot dead | मेहुण्याने फोडले शालकाचे डोके

मेहुण्याने फोडले शालकाचे डोके

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सासूच्या घरासमोर शेळ्या बांधाण्याच्या वादातून मेहुणे व शालक यांच्यात हाणामारी झाली. मेहुण्याने शालकाचे डोके फोडून जखमी केल्याची घटना नंदुरबारातील चिंचपाडा भिलाटी भागात झाली. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
चिंचपाडा भिलाटी भागात रतु सुपडय़ा ठाकरे राहतात. त्यांचे मेहुणे गोरख रमेश तडवी हे देखील त्याच परिसरात राहतात. मेहुणे तडवी यांनी त्यांच्या शेळ्या रतु ठाकरे यांच्या घरासमोर बांधल्या. त्याला ठाकरे यांनी विरोध केला असता माङया सासुचे घर आहे. 
माझाही हक्क असल्याचे तडवी यांनी सांगितल्यावरून त्यांच्यात वाद झाला. गोरख रमेश तडवी, राज्या संजू पाडवी, वसुंधरा गोरख पाडवी, रा.चिंचपाडा भिलाटी यांनी ठाकरे यास बेदम मारहाण केली. त्यात त्याचे डोके फुटले. 
याबाबत रतु ठाकरे यांनी फिर्याद दिल्याने तिघांविरुद्ध   नंदुरबार शहर पोलिसात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार सामुद्रे करीत आहे. 
दरम्यान, अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 

Web Title: The head of the boy shot dead