न्यायालयाच्या निकालानंतर ‘त्या’ पोल्ट्रीतील कोंबड्या नष्ट करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:33 IST2021-02-24T04:33:07+5:302021-02-24T04:33:07+5:30
नंदुरबार : औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या निकालानंतर नवापूर येथील चार पोल्ट्री फार्ममधील ५० हजार ६०० कोंबड्या नष्ट करण्याच्या निर्णय ...

न्यायालयाच्या निकालानंतर ‘त्या’ पोल्ट्रीतील कोंबड्या नष्ट करणार
नंदुरबार : औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या निकालानंतर नवापूर येथील चार पोल्ट्री फार्ममधील ५० हजार ६०० कोंबड्या नष्ट करण्याच्या निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ही मोहीम लवकरच सुरू होणार आहे.
नवापूरमध्ये बर्ड फ्लूची माेठ्या प्रमाणावर साथ सुरू असून, त्यामुळे १७ पाेल्ट्रीफार्ममधील जवळपास सहा कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. ही मोहीम सुरू असतानाच तेथील चार पोल्ट्री व्यावसायिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यात पक्षी नष्ट न करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यामुळे प्रशासनाने मोहीम थांबविली होती. मात्र न्यायालयाने या संदर्भात तज्ज्ञांचा सल्ला घेऊन निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार प्रशासनाने वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञांशी चर्चा केली. संबंधित पोल्ट्रीफार्म बाधित क्षेत्राच्या अडीच किलोमीटर त्रिज्येत असल्याने केंद्र सरकारच्या नियमानुसार या कोंबड्या नष्ट करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. लवकरच या संदर्भातील मोहीम सुरू करणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी उमेश पाटील यांनी दिली.