उसनवार पैश्यांच्या वादातून अपहरण करत एकास बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 21:15 IST2019-03-15T21:14:54+5:302019-03-15T21:15:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : उसनवार पैश्याच्या वादातून एकाचे अपहरण करुन बेदम मारहाण करण्यात आली़ यादरम्यान पिडीतावर गावठी पिस्तुल ...

उसनवार पैश्यांच्या वादातून अपहरण करत एकास बेदम मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : उसनवार पैश्याच्या वादातून एकाचे अपहरण करुन बेदम मारहाण करण्यात आली़ यादरम्यान पिडीतावर गावठी पिस्तुल रोखून त्याच्याकडील मुद्देमाल लांबवल्याची घटना 9 व 10 मार्च रोजी घडली होती़
अठ्ठी ता़ धडगाव येथील सेल्या दखण्या वसावे (35) हे रावजी भिल यांच्यासह म्हसावद येथे 9 मार्च रोजी कामानिमित्त गेले होत़े यावेळी तेथे मुकेश अजरुन चौधरी रा़ शहादा, जयदेव भिकाजी बागुल रा़ खेतिया, आर्या, दिपक, वासू, अण्णा (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्यासह दोघे जण भेटल़े यातील एकाने सेल्या वसावे यांना दिलेल्या उसनवार पैश्यांची मागणी केली़ दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर सेल्या वसावे हे रावजी भिल यांच्यासह रात्री 10 वाजेच्या सुमारास धडगावकडे जात असताना सर्व संशयित आरोपींनी गाडीचा पाठलाग करत दोघांचे अपहरण केल़े दोघांना गोराडी व म्हसावद शिवारात घेऊन जात बेदम मारहाण केली़ यावेळी संशयितातील एकाने सेल्या वसावे यांना गावठी पिस्तुल दाखवत त्यांच्याकडील सोन्याची चैन, मोबाईल व रोख रक्कम असा 2 लाख 31 हजार रुपयांचा मुद्देमाल काढून घेत पहाटेच्या सुमारास सोडून दिल़े मारहाणीत जखमी झालेल्या सेल्या वसावे यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होत़े येथे उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांनी धडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन सर्व आठ संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक अभय मोरे करत आहेत़