चालत्या ट्रकवर चढले आणि साड्या घेऊन पळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 12:28 IST2020-08-30T12:28:36+5:302020-08-30T12:28:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चालत्या ट्रकमध्ये चढून ताडपत्री कापत चोरट्यांनी ट्रकमधील तब्बल ९० हजार रुपये किंमतीचे साडीचे गठ्ठे ...

चालत्या ट्रकवर चढले आणि साड्या घेऊन पळाले
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : चालत्या ट्रकमध्ये चढून ताडपत्री कापत चोरट्यांनी ट्रकमधील तब्बल ९० हजार रुपये किंमतीचे साडीचे गठ्ठे चोरून नेल्याची घटना चिंचपाडा शिवारात महामार्गावर घडली. नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवापूर तालुक्यात महामार्गावर चालत्या ट्रकमधून साहित्य लंपास करण्याच्या घटना वेळोवेळी घडल्या आहेत. आता पुन्हा चोरट्यांनी डोके वर काढले आहे. २८ आॅगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास धुळ्याकडून सुरतकडे जाणाऱ्या रस्त्यावर चोरट्यांनी हा कारनामा केला. चालत्या मालट्रकमध्ये (क्रमांक जीजे १५एटी ४३४०) चढून चोरट्यांनी ताडपत्री कापून आतील साड्यांचे नऊ गठ्ठे चोरले. त्यांची किंमत ९० हजार रुपये इतकी आहे. चालक सुनीलकुमार गेदू यादव, रा.सक्रामपूर (बिहार) यांना ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी महामार्गावर आलेल्या भागात तपास केला असता उपयोग झाला नाही. त्यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार बळवंत वळवी करीत आहे. चालत्या ट्रकमधून एवढी मोठी चोरी करण्यासाठी तीन ते चार जणांची टोळी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चोरट्यांच्या टोळीला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा लावणे आवश्यक आहे.