चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर कुºहाडीने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 12:51 IST2020-08-10T12:51:12+5:302020-08-10T12:51:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर कुºहाडीने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना सोरापाडा, ता.अक्कलकुवा येथे घडली. ...

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर कुºहाडीने वार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर कुºहाडीने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना सोरापाडा, ता.अक्कलकुवा येथे घडली. पत्नीविरुद्ध अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नमला तडवी, रा.अक्कलकुवा असे संशयीताचे नाव आहे. नमला तडवी हा आपल्या पत्नीवर नेहमीचा चारित्र्याचा संशय घेत होता. त्यातून त्यांचा वाद होत होता. ३० जुलै रोजी सकाळी सहा वाजता या वादातून त्याने पत्नीवर थेट कुºहाडीने वार केले. पत्नी जमिनीवर झोपलेली असतांना संशयाचे भूत डोक्यात घुसलेल्या नमला याने घरात पडलेली कुºहाड घेत थेट पत्नीच्या डोक्यावर, तोंडावर, हातावर वार केले. त्यात ती जखमी झाली. गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार घेतांना फिर्याद दिल्याने पती नमला तडवी विरुद्ध अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल झाला.