शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

वाहतूक नियोजनात फेरीवाल्यांचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 12:44 PM

समविषमचाही उपयोग नाही : पालिकेने पर्यायी जागा देण्याबाबत विचार करावा

नंदुरबार : रस्त्यावरील रहदारीस अडथळा ठरणारे व फेरीवाल्यावर वाहतूक पोलीस तसेच शहर आणि उपनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी थेट गुन्हे दाखल करतात. यामुळे या व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे. अशा व्यावसायिकांना पर्यायी जागा देण्याबाबत मात्र फारसे कुणी गांभिर्याने घेत नाही. पर्यायी जागा देण्याचे ठरले तरी कुठे  देणार हा पालिकेपुढे मोठा प्रश्न आहे. दरम्यान, समविषम पार्क्ीगनंतर आता हा प्रश्न सोडवावा अशी मागणी होत आहे. शहरातील फेरीवाल्यांना पर्यायी जागाच उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी शहरातील विविध रस्ते, चौक आणि गल्लीबोळ देखील काबीज केले आहेत. यामुळे मोठी समस्या निर्माण होत आहे. रहदारीस अडथळा ठरणा:या अशा व्यावसायिकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे प्रकार देखील वेळोवेळी घडलेले आहेत. त्यामुळे आता पर्यायी जागेचा मुद्दा पुन्हा पुढे येऊ लागला आहे. शहर वाहतूक शाखेने नुकताच सम-विषम पार्क्ीगचा उपक्रम सुरू केला आहे. परंतु फेरीवाल्यांमुळे या उपक्रमाचा फारसा उपयोग होत नसल्याची स्थिती दिसून येत आहे.फेरीवाल्यांची सर्वाधिक समस्याशहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ आणि चौकांमध्ये फेरीवाल्यांची समस्या मोठय़ा प्रमाणावर आहे. अनेक भागात तर दुचाकी काढणे देखील मुश्कील होते. विशेष म्हणजे मंगळ बाजारातील सरदार सोप फॅक्टरीपासून तर थेट महाले हॉटेलर्पयत रस्त्याच्या दुतर्फा भाजीविक्रेते हातगाडी लावून उभे असतात. शिवाय रस्त्यावर बसून भाजीपाला, फळे विक्री करणारे देखील मोठय़ा प्रमाणावर आहे. या ठिकाणी एवढे अतिक्रमण वाढले आहे की, चालणे देखील मुश्किल होते. परिणामी गर्दीच्या वेळी बाजारासाठी येणा:या महिला, मुलींना धक्काबुकीचे प्रकार हमखास  घडतात.याशिवाय या रस्त्यावर दोन्ही बाजून व्यापा:यांनी लाखो रुपये खर्च करून गाळे घेतले आहेत. या गाळ्यांमधील दुकानांमध्ये जाण्यासाठी देखील वाट काढत जावे लागते. परिणामी अशा व्यवसायिकांच्या व्यवसावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. अशा व्यापा:यांनी पालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही लक्ष दिले जात नसल्याचा सूर आहे. याउलट रस्त्यावर बसणारे व हातगाडीवरील  विक्रेत्यांच्या दादागिरीस अशा दुकानदारांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.कारवाईनंतर जैसे थे होतेपालिकेने आतार्पयत जेवढे व जितक्या वेळा अतिक्रमण काढले त्यानंतर दोन, चार दिवसांनी पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होते. अर्थात फेरीवाल्यांना इतर ठिकाणी देखील पर्यायी जागा दिली गेली नसल्याने त्यांच्यावर बेरोजगार होण्याची आणि उपासमारीची वेळ येते. त्यामुळे पुन्हा त्याच ठिकाणी असे व्यवसायिक व्यवसाय सुरू करतात हे नित्याचे आहे.पर्यायी जागेचे काय?अशा फेरीवाल्यांना पर्यायी जागेचे काय? हा प्रश्न कायम राहतो. अतिक्रमण हटवितांना या बाबींचाही विचार झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.शहराला लागून पर्यायी जागा नाही. नेहरू चौक परिसरात तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर तात्पुरती जागा आहे. तेथे क्रिडा संकुलाचे काम सुरू झाल्यावर त्यांना तेथून हटविले जाणार आहे. त्यामुळे या परिसरात उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या जागेवर अशा व्यवसायिकांना जागा देता येऊ  शकते.दुसरी पर्यायी जागा नवीन बसस्थानकासमोर व वीज वितरण कार्यालयाच्या बाजुला असलेली जागा पर्यायी ठरू शकते. त्याबाबतही विचार व्हावा अशी अपेक्षा फेरीवाल्यांकडून करण्यात येत आहे.दुकानदारांचेही अतिक्रमणअनेक दुकानदार आपल्या दुकानाचे सामान दुकानाबाहेर भर रस्त्यावर ठेवत असतात. त्यामुळे देखील रहदारीला अडथळा निर्माण होतो. स्टेशन रोडवरील नगरपालिका चौक ते नेहरू पुतळा आणि तेथून थेट बसस्थानकार्पयत दोन्ही बाजूंच्या दुकानांमधील सामान बाहेर ठेवले जातात. याशिवाय दुकानांचे फलक देखील बाहेर लावलेले असतात. अशा दुकानदारांवर देखील कारवाई करावी अशी मागणी होत आहे.