सोशल मीडियावरही महिलांचा छळ; ‘सायबर’कडे २० तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:19 IST2021-07-24T04:19:37+5:302021-07-24T04:19:37+5:30
नंदुरबार : बदलत्या काळात सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. वाढलेला हा वापर अनेक बाबींनी त्रासदायक ठरत असून जिल्ह्यात ...

सोशल मीडियावरही महिलांचा छळ; ‘सायबर’कडे २० तक्रारी
नंदुरबार : बदलत्या काळात सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. वाढलेला हा वापर अनेक बाबींनी त्रासदायक ठरत असून जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत सोशल मीडियातून महिलांचा छळ केल्याचे तब्बल १४ गुन्हे दाखल झाले असून सहा महिलांनी तक्रारीही दिल्या आहेत. सायबर सेलकडे आलेल्या या तक्रारी आणि गुन्ह्यांचा छडा लावून महिलांचा छळ करून बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.
बदनामीच्या भीतीने तक्रारी करणे टाळतात..
गेल्या काही काळात महिलांकडून सोशल मीडियाचा वापर वाढवला गेला आहे. यातून नवीन ओळखी, मैत्री होते. परिणामी गैरकृत्य करणारे अशा महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्या छायाचित्रे आणि वैयक्तिक माहितीचा गैरवापर करतात. यात काही युवतींचा छळ झाला आहे; परंतु बदनामी होईल या भीतीने तक्रारी करण्यास टाळाटाळ केली जाते.
महिलांनी सोशल मीडियातून होणाऱ्या छळाला बळी न पडता, सरळ पोलिसात तक्रारी केल्या पाहिजेत. आपल्यावर अन्याय होतोय हे मांडले पाहिजे. बदनामी किंवा इतर बाबीची भीती बाळगू नये.
- मालती वळवी, महिला कार्यकर्ती, नंदुरबार.
महिलांनी अशा प्रकारे कोणी छळ करत असल्यास थेट सायबर सेल, पोलीस ठाणे यांना संपर्क करावा. गुन्हा करणारा कधीही मोकाट फिरु शकत नाही. तो सापडतोच हे लक्षात ठेवावे.
- योगिता बडगुजर, महिला कार्यकर्ती, नंदुरबार.
महिलांनी सायबर सेलला माहिती द्यावी
महिलांनी सोशल मीडियाचा वापर करताना दक्षता घेतली पाहिजे. कोणी त्रास देत असेल तर महिलांनी तातडीने सायबर सेलकडे धाव घेतली पाहिजे.
- रवींद्र कळमकर, पोलीस निरीक्षक, सायबर सेल.
सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणी त्रास देत असल्यास लागलीच आपल्या हद्दीतील पोलीस ठाण्याशी संपर्क साधायला हवा.
महिला या सोशल मीडियाचा वापर खूप कमी प्रमाणात करतात. ज्या करतात त्यांची संख्या कमीच आहे.
सोशल मीडियाच्या तक्रारी असल्यास पोलिसांचा सायबर सेल हा स्वतंत्रपणे कार्यरत करण्यात आलेला आहे.