नंदुरबार जिल्ह्यात आठ विवाहितांचा छळ, वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:09 IST2021-02-05T08:09:31+5:302021-02-05T08:09:31+5:30

नंदुरबार : वेगवेगळ्या घटनेत जिल्ह्यातील आठ विवाहितांचा छळ केल्याची घटना घडली. गेल्या तीन दिवसात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल ...

Harassment of eight married women in Nandurbar district, crime in different police stations | नंदुरबार जिल्ह्यात आठ विवाहितांचा छळ, वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा

नंदुरबार जिल्ह्यात आठ विवाहितांचा छळ, वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा

नंदुरबार : वेगवेगळ्या घटनेत जिल्ह्यातील आठ विवाहितांचा छळ केल्याची घटना घडली. गेल्या तीन दिवसात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

धडगाव तालुक्यातील बिजरीचा वियारावड येथील सुनीता भीमसिंग वळवी या विवाहितेचा गावातीलच सासरी घरातील काम येत नाही, मजुरीला जात नाही म्हणून सासरच्या लोकांनी छळ केला. छळाला कंटाळून सुनीताबाई यांनी फिर्याद दिल्योन भमसिंग डोंगा वळवी, डोंगा माद्या वळवी, रानुबाई डोंगा वळवी, रा.बिजरीचा वियारावड यांच्याविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी घटना गोरखपूर येथे घडली. नंदुरबारातील पटेलवाडी भागातील विवाहिता सैय्यद नुरसबा यांचा विवाह सैय्यद मोहम्मद अब्दुल आलम यांच्याशी झाला होता. सासरची मंडळी चारित्र्याच्या संशयावरून त्यांना त्रास दिला जात होता. त्या त्रासाला कंटाळून महिलेने फिर्याद दिल्याने सैय्यद अब्दूल आलम, नफिसा खातून आलम यांच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.

तिसरी घटना ठाणेपाडा, ता.नंदुरबार येथील विवाहितेबाबत घडली. मनीषा संतोष सूर्यवंशी या विवाहितेचा सासरी गुलतारे, ता.साक्री येथे माहेरून पैसे आणण्यासाठी छळ केला जात होता. त्याला कंटाळून मनीषा यांनी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून संतोष रामदास सूर्यवंशी, रामचंद्र जानू सूर्यवंशी, रत्नाबाई रामचंद्र सूर्यवंशी, बेडकीखडी, अनिता कोकणी, भिल्या कोकणी, रा.गुलतारे यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौथी घटना भागापूर, ता.शहादा येथे घडली. पूजा पंकज पाटील, रा.पुरुषोत्तमनगर यांचा सासरी भागापूर येथे छळ केला जात होता. त्याला कंटाळून त्यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पंकज मधुकर पाटील, रा.वापी, मधुकर उद्धव पाटील, लीलाबाई मधुकर पाटील, नंदकिशोर मधुकर पाटील, रा.लोणखेडा, कविता संजय पाटील, संजय श्रीपत पाटील व निशा पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचवी घटना सोनगीर येथे घडली. अपंग मुलगी झाली, त्याचवेळी गर्भपिशवी काढण्यात आली, त्यामुळे आता मूलबाळ होणार नाही म्हणून विवाहितेचा छळ केल्याने कोंढावळ, ता.शहादा येथील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सुरेखा विलास बागुल या विवाहितेचा छळ करण्यात येत होता. त्याला कंटाळून त्यांनी फिर्याद दिल्याने विलास हिराजी बागूल, हिराजी गबा बागूल, निर्मला हिराजी बागूल, रा.कोंढावळ, ता.शहादा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहावी घटना खळीबर्डी, ता.नवापूर येथे घडली. नोकरीवाली सून पाहिजे होती, दिसायला सुंदर नाही तसेच पतीच्या विवाहबाह्य संबंधाविषयी जाब विचारल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ करण्यात आला. दीपिका उत्कर्ष गावीत यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून उत्कर्ष हरीश गावीत, दिनाबाई हरीश गावीत, हरीश बापू गावीत रा. खळीबर्डी यांच्याविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातवी घटना नंदुरबारच्या विवाहितेविषयी घडली. प्रिंकल नीलेश गायकवाड, रा.सरगम कॅालनी, नंदुरबार यांचा यावल, जि.जळगाव येथे सासरी छळ झाला. पतीच्या नोकरीसाठी माहेरून २० लाख रुपये आणावे यासाठी छळ केला जात होता. त्याला कंटाळून प्रिंकल गायकवाड यांनी फिर्याद दिल्याने नीलेश राजेंद्र गायकवाड, राजेंद्र चिंतामण गायकवाड, शैलाबाई गायकवाड, वैशाली प्रशांत जाधव, सर्व रा.गणपतीनगर, यावल यांच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आठवी घटना यावल, जि.जळगाव येथेच घडली. नंदुरबारातील कसाई मोहल्ला भागात राहणारी फौजियानाज मोहसीन खान या महिलेचा माहेरून दहा लाख रुपये आणावे यासाठी छळ करण्यात येत होता. तलाक देण्याची धमकी दिली जात होती. त्या छळाला कंटाळून फौजियाखान यांनी फिर्याद दिल्याने मोहसीन खान आबिदखान, जरीना आबिदखान, आसिफखान आबिदखान, मोहसीनाबी आबिदखान, जावेदखान आबिदखान, रुबीनाबी जावेदखान सर्व रा.डांगपुरा कुरेशी मोहल्ला, यावल यांच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Harassment of eight married women in Nandurbar district, crime in different police stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.