50 हजारांसाठी विवाहितेचा छळ करणा:या सासरच्यांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 12:45 IST2019-09-27T12:45:01+5:302019-09-27T12:45:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर येथील माहेर तर सुरत येथील सासर असलेल्या विवाहितेचा 50 हजार रुपयांसाठी सासरच्यांनी छळ ...

Harassment of the bride for 50 thousand: crime against the mother-in-law | 50 हजारांसाठी विवाहितेचा छळ करणा:या सासरच्यांविरोधात गुन्हा

50 हजारांसाठी विवाहितेचा छळ करणा:या सासरच्यांविरोधात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवापुर येथील माहेर तर सुरत येथील सासर असलेल्या विवाहितेचा 50 हजार रुपयांसाठी सासरच्यांनी छळ केला़ याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला़ 
आसेफा जावेद शेख यांचा पती जावेद सलीम शेख, सासू रोशन सलीम शेख, सासरे सलीम शेख, अस्मा जलालउद्दीन सर्व रा़ ऊन पाटीया सुरत, यांनी जुलै 2019 पासून छळ केला होता़ पतीला रिक्षा घेण्यासाठी माहेरुन 50 हजार रुपये आणावेत अशी मागणी त्यांच्याकडून होत होती़ दरम्यान सासरच्यांकडून मारहाण होत असल्याने आसेफा यांनी नवापुर येथील माहेरी दिली होती़ माहेरी आल्यानंतर त्यांनी महिला तक्रार निवारण कक्षात अर्ज करुन दाद मागितली होती़  त्यावर कारवाई करण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे आदेश दिले गेले होत़े याप्रकरणी बुधवारी आसेफा यांनी बुधवारी दिलेल्या फिर्यादीवरुन पतीसह त्याच्या कुटूंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस कॉन्स्टेबल वंजारी करत आहेत़ 
 

Web Title: Harassment of the bride for 50 thousand: crime against the mother-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.