नंदुरबार बसस्थानकावर हॅण्वॉश सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 11:54 IST2020-03-21T11:54:11+5:302020-03-21T11:54:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाचा व्हायरस रोखण्यासाठी नंदुरबार बस स्थानकावरील सुलभ शौचालया शेजारी प्रवाशांच्या सुविधेसाठी हॅण्डवॉश अर्थात हात ...

नंदुरबार बसस्थानकावर हॅण्वॉश सुविधा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाचा व्हायरस रोखण्यासाठी नंदुरबार बस स्थानकावरील सुलभ शौचालया शेजारी प्रवाशांच्या सुविधेसाठी हॅण्डवॉश अर्थात हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
या हॅण्डवॉश केंद्राचे उद्घाटन नंदुरबार आगार प्रमुख मनोज पवार यांच्या हस्ते करण्यात आले. ही सविधा मेहतर समाज सामाजिक शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष कमल कडोसे यांच्या सहकार्याने प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. या ठिकाणी ही सेवा रात्री उशिरापर्यंत राहणार प्रवाशांना उपलब्ध राहणार आहे. नियमितपणे हात धुण्यासाठी गर्दी करीत आहेत. नंदुरबार बसस्थानक नेहमीच प्रवाशांच्या सुविधेसाठी आग्रही असल्याची प्रतिक्रीया शहरी तथा ग्रामीण भागातील प्रवाशांनी व्यक्त केली.