हातपंप दुरुस्ती करणाऱ्या पथकांना वाहन मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 12:26 IST2020-06-11T12:26:06+5:302020-06-11T12:26:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत सर्व सहा तालुक्यात टाकण्यात आलेल्या हातपंप दुरुस्तीसाठी नियुक्त ...

Hand pump repair teams could not find a vehicle | हातपंप दुरुस्ती करणाऱ्या पथकांना वाहन मिळेना

हातपंप दुरुस्ती करणाऱ्या पथकांना वाहन मिळेना

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत सर्व सहा तालुक्यात टाकण्यात आलेल्या हातपंप दुरुस्तीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या पथकांना वाहनच नसल्याची स्थिती आहे़ यामुळे यंदा हातपंपांची दुरुस्ती करण्याची कामे रखडल्याचे चित्र आहे़
टंचाई निवारण कार्यक्रमांतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सर्व सहा तालुक्यात हातपंप दुरुस्ती पथके कार्यान्वित केली होती़ या पथकांना वाहने मंजूर करण्यात आली होती़ नवीन वाहन खरेदी किंवा भाडोत्री वाहन करुन पथकांनी तालुक्यात भेटी देऊन दुरुस्त्या करावयाच्या होत्या़ परंतू वाहनाअभावी शहादा, नवापुर, नंदुरबार, धडगाव, अक्कलकुवा आणि तळोदा तालुक्यात दुरुस्ती पथक फिरुच शकले नसल्याची माहिती देण्यात आली आहे़ यातून नादुरुस्त हातपंपांची संख्या वाढून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई सहन करावी लागत आहे़ अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाही़ पावसाला सुरुवात झाल्यावरही किमान दोन आठवडे पिण्याचे पाणी उपलब्ध होणार नाही़ जमिनीतील भूजल खोल गेले असल्याने सातपुड्याच्या दुर्गम भागातील गाव पाड्यांना मोठी टंचाई भेडसावत आहे़
या पार्श्वभूमीवर हातपंप मोठा आधार आहेत़ परंतू पथकांना तेथवर पोहोचण्यासाठी वाहने मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत़ यामुळे शासनाने नियुक्त केलेल्या पथकांसाठी वाहनाची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे़

याबाबत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पी़टी़बडगुजर यांना माहिती विचारली असता, त्यांनी सांगितले की, वाहना संदर्भातील प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठवला आहे़ सध्या काळात पंचायत समित्यांनी भाडे तत्त्वावर वाहनांची व्यवस्था करुन घेतल्यास अडचणी दूर होणार आहेत़ नवीन हातपंप दुरुस्ती वाहन येईपर्यंत हा उपक्रम सुरु ठेवण्यावर भर देण्यात यावा अशा सूचना केल्या आहेत़ दरम्यान त्यांच्या या सूचनेनंतरही पंचायत समित्यांमध्ये दुरुस्ती पथकांकडे वाहन प्राप्त झालेले नसल्याची माहिती समोर आली आहे़ यामुळे नाराजी व्यक्त होत आहे़

Web Title: Hand pump repair teams could not find a vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.