हातोडा पूल झाला ‘वाहनतळ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 12:53 IST2020-08-06T12:53:19+5:302020-08-06T12:53:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गुजरातमधील तापी नदी पात्रातून उपसा केलेली वाळू घेऊन जाण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून येणारी वाहने ...

हातोडा पूल झाला ‘वाहनतळ’
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गुजरातमधील तापी नदी पात्रातून उपसा केलेली वाळू घेऊन जाण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून येणारी वाहने हातोडा पुलावर एका ओळीत थांबून रहात असल्याने वाहतूक कोंडी होत आहे़ पुलावर एकाच वेळी ५० ट्रक उभ्या राहत आहेत़
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने गुजरात राज्यातून उपसा केलेल्या वाळूची वाहतूक महाराष्ट्रातून करण्यास बंदी आहे़ यातून वाळू वाहनांवर कारवाई होण्याचे सत्र सुरू आहे़ यानंतरही चोरट्या मार्गांनी शेकडो ट्रक वाळू घेण्यासाठी हातोडा (गुजरात) येथे येत असून वाळू भरण्याचा नंबर येईपर्यंत पात्रात थांबू शकत नसल्याने ही अवजड वाहने थेट पुलावर थांबवली जात आहेत़ यातून हातोडा पुलावरून एकाच बाजूने वाहतूक सुरू असल्याचे चित्र आहे़ या मार्गावरून शासकीय अधिकारी व कर्मचारीही शासकीय वाहनाने ये-जा करतात़ त्यांनाही या प्रकाराचा फटका बसत आहे़ तळोदाकडे जाताना हातोडा पुलावर वळण घेताना समोरून येणाऱ्या ट्रक जागीच वळवण्यात येत असल्याने वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार वाढले आहेत़ गुजरात राज्यातील तापी नदी पुलावर बांधण्यात आलेला हातोडा पूल हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील आहे़ यासाठी निधीही खर्च करण्यात आला होता़ परंतु तूर्तास पुलावरच ट्रक पार्किंग केली जात असल्याने पुलाच्या बांधकामाला बाधा येण्याची शक्यता आहे़ काही वेळा पाणी गाळण्यासाठी वाळू भरून झालेल्या ट्रकही ओळीने पुलावर उभे केल्या जात असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे़ प्रशासनाने याकडे लक्ष देवून गुजरात प्रशासनासोबत संपर्क पुलावर थांबणाºया ट्रक बाजूला करण्याची मागणी मार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्यांची आहे़