्नराज्यपालांसाठी अर्धेच केले काम उर्वरित रस्त्यालाच केला ‘रामराम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 01:54 PM2020-02-25T13:54:34+5:302020-02-25T13:54:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा दौऱ्यावर येऊन परत जाणाºया राज्यपालांना महामार्गावर खड्ड्यांची झळ बसू नये म्हणून बांधकाम विभागाच्या ...

Half of the work done for the governors was done on the rest of the road, 'Ramram' | ्नराज्यपालांसाठी अर्धेच केले काम उर्वरित रस्त्यालाच केला ‘रामराम’

्नराज्यपालांसाठी अर्धेच केले काम उर्वरित रस्त्यालाच केला ‘रामराम’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा दौऱ्यावर येऊन परत जाणाºया राज्यपालांना महामार्गावर खड्ड्यांची झळ बसू नये म्हणून बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने नंदुरबार ते खांडबारा दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर केवळ पाच किलोमीटर रस्त्याचे अर्धेच डांबरीकरण करत उर्वरित रस्त्याला ‘रामराम’ केल्याचा हास्यास्पद प्रकार समोर आला आहे़ हे पाच किलोमीटर डांबरीकरण सोयीचे ठरण्याऐवजी त्रासदायकच ठरत असल्याने नाराजीही व्यक्त होत आहे़
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २० आणि २१ फेब्रुवारी जिल्हा दौºयावर येऊन गेले़ हेलिकॉप्टरने आलेले राज्यपाल हेलिकॉप्टरनेच जाणार असले तरी त्यांचा नंदुरबार येथून ते नवापुर तालुक्यात जाणार होते़ या यासाठी खांडबारा ते भादवड दरम्यान पाच किलोमीटर महामार्गाचे एका रात्रीतून डांबरीकरण करण्यात आले होते़ तातडीने करण्यात आलेल्या या कामातून राज्यपालांना विकास जाणवला पाहिजे असा प्रयत्न करण्यात आला की काय अशी चर्चा सुरु आहे़ महामार्ग प्राधिकरणने संपूर्ण रस्ता डांबरीकरण करण्याची अपेक्षा असताना केवळ एकाच बाजून ठिगळ लावल्यागत डांबरीकरण करुन वेळ मारुन नेल्याने आता मार्गावरुन जाणाऱ्यांना अडचणी येत आहे़ राज्यपाल या मार्गाने जाणार असल्याने केवळ रस्त्याचा तेवढाच भाग पूर्ण करण्यात आला़ या अत्यंत तकलादू डांबरीकरण केले असल्याने सुविधेऐवजी वाहनधारकांना असुविधा अधिक होत असल्याचे चित्र आहे़
विसरवाडी ते सेंधवा या राष्ट्रीय महामार्गाची उभारणी करण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने महामार्ग प्राधिकरण ही विंग उभारुन त्याकडे हे काम सोपवले आहे़ यातून रस्ता नंदुरबार जिल्ह्यातील असला तरी महामार्गाचे कार्यालय मात्र धुळ्यात आहे़ त्याठिकाणी कार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंता दर्जाचे अधिकारी आहेत़ परंतू ते इकडे फिरकतही नसल्याने रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत़ राज्यपालांच्या वाहनांचा ताफा जाईल तेवढ्याच बाजूने रस्ता तयार करुन लाखो रुपयांची बिले लाटणाºया संबधित अधिकाºयांसह ठेकेदारावर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे़

Web Title: Half of the work done for the governors was done on the rest of the road, 'Ramram'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.