शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
2
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
3
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
4
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
5
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
6
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
7
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
8
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
9
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
10
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
11
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
12
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
13
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
14
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

दोन विद्यार्थ्यांचा हकनाक बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 12:46 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वाळू वाहतुकीच्या भरधाव वाहनांवर कुणाचाही वचक नसल्याचे पुन्हा एकदा नांदरखेडा फाट्याजवळील अपघाताने स्पष्ट झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वाळू वाहतुकीच्या भरधाव वाहनांवर कुणाचाही वचक नसल्याचे पुन्हा एकदा नांदरखेडा फाट्याजवळील अपघाताने स्पष्ट झाले आहे. डंपरमध्ये वाळू भरलेले नसले तरी ते वाळू वाहतुकीचेच असल्याचे चौकशीत समोर आले आहे. दरम्यान, या अपघातात दोन युवकांचा बळी गेल्याने नांदरखेडा व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गुजरातमधून नंदुरबारमार्गे नाशिक, मुंबई, औरंगाबाद या भागात मोठ्या प्रमाणावर वाळू वाहतूक केली जाते. त्यासाठी अवजड वाहनांचा वापर केला जातो. डंपरचे प्रमाण सर्वाधिक आहे. ही वाहने भरधाव जात असल्यामुळे अनेकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. बुधवारी पहाटे झालेली घटना देखील त्याचेच परिपाक असल्याचे बोलले जात आहे. साक्रीकडून नंदुरबारकडे जाणाऱ्या भरधाव डंपरने रस्त्याच्या कडेला असलेल्या घरावर थेट धडक दिली. घराबाहेर खाटेवर झोपलेल्या दोन युवकांचा त्यात हकनाक बळी गेला. त्यातील प्रवीण राठोड हा युवक औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात शिकत होता. त्याची सद्या परीक्षा सुरू आहे. रात्री उशीरापर्यंत त्याने अभ्यास केला. झोपी गेल्यानंतर काही तासातच काळाने त्याच्यावर घाला घातला. दुसरा युवकही महाविद्यालयत शिकत होता. या युवकांच्या हकनाक बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.या अपघातात दोन म्हशी व पाच शेळ्यांचा देखील बळी गेला आहे. याशिवाय तेथे उभी असलेली दुचाकीही डंपरखाली चिरडली गेली आहे. या अपघातात बळी तर गेले परंतु लाखो रुपयांचे देखील नुकसान झाले आहे. सकाळी संतप्त गावकरी घटनास्थळी जमा झाले. त्यांनी संताप व्यक्त केला. पोलिसांनी वेळीच त्यांची समजून घातल्याने अनर्थ टळला. पोलिसांनी डंपर जप्त केले आहे.