जिल्ह्यातील जीम व व्यायामशाळा सुरू होणार पण अटी व शर्तींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 12:44 PM2020-10-28T12:44:54+5:302020-10-28T12:45:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करुन जीम व व्यायामशाळा सुरु ...

Gym and gymnasium will be started in the district but on terms and conditions | जिल्ह्यातील जीम व व्यायामशाळा सुरू होणार पण अटी व शर्तींवर

जिल्ह्यातील जीम व व्यायामशाळा सुरू होणार पण अटी व शर्तींवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करुन जीम व व्यायामशाळा सुरु करण्यास जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी परवानगी दिली आहे.  या ठिकाणी कोविड-१९ संदर्भात प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनाचे पालन करणे आवश्यक राहणार आहे.
प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार  जिम व व्यायामशाळेत येणार्यांनी   सोशल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायझर वापर करणे  बंधनकारक राहणार असून थुंकण्यास पूर्णपणे प्रतिबंध असेल. सर्वांना आरोग्य     सेतू ॲपचा वापर करणे, स्वत:ची  आरोग्य निरीक्षणे करणे व आजारी असल्यास तात्काळ जिल्हा प्रशासनास कळविणे बंधनकारक  राहणार आहे.
सोशल डिस्टन्सिंग करत उपकरणे किमान ६ फूट तर श्वासाची गती वाढविणाऱ्या व्यायामासाठीच्या उपकरणादरम्यान १२ फूट अंतर राखले जावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ग्राहकांच्या सोयीसाठी जीमचालकांनी संपर्क न येणाऱ्या ऑनलाईन पेमेंट सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. स्वच्छ हवा आत येण्यास जागा असावी व वातानुकूलन उपकरणांचे तापमान २४ ते ३० डिग्री सेल्सिअस असावे.   दरम्यान स्पा, सौना, स्टीम बाध व जलतरण     तलाव मात्र बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ६५ वर्षांवरील नागरिक, व्याधीग्रस्त नागरिक, गर्भवती महिला आणि १० वर्षांखालील मुलांना जीम , व्यायामशाळेच्या परिसरात व्यायाम करता येणार नाही. 
जीम, व्यायामशाळा सुरु करणेपूर्वी उपकरण तसेच परिसर निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  जीम व व्यायामशाळेत कर्मचारी आणि सदस्य याची संख्या कमीत कमी असावी. सामाजिक अंतर राखण्यासाठी कर्मचाऱ्यांची शिफ्ट आणि उपस्थिती सुनिश्चित करण्याचे कळवण्यात आले आहे. जीम, व्यायामशाळेमध्ये प्रवेश करतांना प्रवेश द्वाराजवळ सॅनिटायझर व थर्मल स्क्रिनिंगची सोय करावी. केवळ लक्षणे नसलेल्या व्यक्तींना प्रवेश द्यावा, जीम, व्यायामशाळेमध्ये प्रवेश करणाऱ्या व बाहेर जाणाऱ्यांच्या नोंदणीसाठी स्वंतत्र नोंदवही ठेवण्याचे आदेशात म्हटले आहे. शासनाच्या आदेशानुसार कारवाई न झाल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे कळवण्यात आले आहे. 

Web Title: Gym and gymnasium will be started in the district but on terms and conditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.