गटारीचा स्लॅब तुटून ट्रक अडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 12:19 IST2019-12-17T12:19:00+5:302019-12-17T12:19:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहादा-तळोदा रस्त्यावर नव्यानेच तयार करण्यात आलेल्या गटारीचा स्लॅब तुटून त्यात ट्रक अडकल्याची घटना घडली. ...

The gutter slab smashed into the truck | गटारीचा स्लॅब तुटून ट्रक अडकला

गटारीचा स्लॅब तुटून ट्रक अडकला

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहादा-तळोदा रस्त्यावर नव्यानेच तयार करण्यात आलेल्या गटारीचा स्लॅब तुटून त्यात ट्रक अडकल्याची घटना घडली. या घटनेत सुदैवाने कुठलीही जिवितहानी झाली नाही. परंतु या घटनेने बांधकाम झालेल्या गटारीच्या कामाची पडताळणी व्हावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
याबाबत वृत्त असे की, कोळदा ते खेतिया रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करताना बाजूला गटारी बनविण्यात आल्या आहेत. मात्र या गटारींचे काम योग्य पद्धतीने झाले किंवा नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहादा शहराजवळील शिरुड फाट्याजवळील अंबिका फर्निचरला लागून सर्विस रोड असून त्याठिकाणी गटार आहे. या गटारीची उंची चार ते पाच फूट आहे. गटारीवर स्लॅब टाकण्यात आलेला असून हे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. साईबाबा मंदिरापासून ते वीज वितरण कंपनीच्या कार्यालयापर्यंत गटारीवर ठिकठिकाणी भगदाड पडलेले आहे. सर्विस रोडला लागून शॉपिंग कॉम्प्लेक्स असल्याने दुचाकीपासून तर अवजड वाहनांपर्यंत वाहन रस्त्याच्या पलीकडे ये-जा करतात. शिरुड फाट्याजवळ एक ट्रकचा (क्रमांक एम.एच. १९ एल-४५९१) चालक जगन्नाथ मोरे (रा.वाघळी, ता.चाळीसगाव) हे ट्रान्सपोर्टमध्ये सामान उतरविण्यासाठी प्रकाशाकडून शहाद्याकडे येत होते. शिरुड फाट्याजवळ ट्रक मागे घेताना बाजूला असलेल्या गटारीचा स्लॅप तुटला व गाडी मध्येच अडकली. सुदैवाने चालकास कुठलीही दुखापत झाली नसली तरी गटारीच्या बांधकामाचा दर्जा मात्र समोर आला. त्यामुळे या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: The gutter slab smashed into the truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.