कुढावद येथे ५७ हजारांचा गुटखा जप्त, एकाविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:10 IST2021-02-05T08:10:17+5:302021-02-05T08:10:17+5:30
नंदुरबार : कुढावद (ता. शहादा) येथील दुकानाजवळ उभ्या असलेल्या मालवाहतूक वाहनातून पोलिसांनी ५६ हजार ८८५ रुपयांचा गुटखा जप्त केला. ...

कुढावद येथे ५७ हजारांचा गुटखा जप्त, एकाविरुद्ध गुन्हा दाखल
नंदुरबार : कुढावद (ता. शहादा) येथील दुकानाजवळ उभ्या असलेल्या मालवाहतूक वाहनातून पोलिसांनी ५६ हजार ८८५ रुपयांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी एकाविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोविंद नेनाजी चौधरी (रा. कुढावद, ता. शहादा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. कुढावद येथे अवैध गुटखा असल्याची माहिती म्हसावद पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या भागात गस्त घातली असता चौधरी यांच्या किराणा दुकानाजवळ एक मालवाहू वाहन उभे असल्याचे दिसले. पोलिसांनी त्या वाहनाची तपासणी केली असता त्यात ५६ हजार ८८५ रुपये किंमतीचा गुटखा आढळून आला. गुटखा विक्रीस बंदी असतानाही तो बाळगल्याने पोलिसांनी पंचनामा केला. ५६ हजार ८८५ रुपयांचा गुटखा व तीन लाख रुपयांचे चारचाकी मालवाहू वाहन असा एकूण तीन लाख ५६ हजार ८८५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी पोलीस कर्मचारी सिद्धार्थ गोकुळ सुरवाडे यांनी फिर्याद दिल्याने गोविंद चौधरी, रा.कुढावद यांच्याविरुद्ध म्हसावद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार रामदास पावरा करीत आहेत.