नंदुरबारात ५२ हजारांचा गुटखा जप्त, एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:42 IST2021-02-27T04:42:54+5:302021-02-27T04:42:54+5:30
नंदुरबार : शहरातील किराणा दुकानदाराकडून ५२ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली ...

नंदुरबारात ५२ हजारांचा गुटखा जप्त, एकास अटक
नंदुरबार : शहरातील किराणा दुकानदाराकडून ५२ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
जगदीश दत्तात्रय कायस्थ, रा. जळकाबाजार गल्ली, नंदुरबार असे अटक करण्यात आलेल्या दुकानदाराचे नाव आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री होत आहे. याबाबत पोलीस व अन्न सुरक्षा अधिकारी कार्यालयातर्फे कारवाई करण्यात येत आहे. शहरातील जळका बाजारात देखील एका दुकानात गुटखा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावर त्या ठिकाणी तपासणी करण्यात आली. जगदीश कायस्थ यांनी आपल्या दुकानात अवैधरित्या विमल गुटखा, मिराज, बागलान, तानसेन या कंपनीचा सुमारे ५२ हजार ७२ रुपयांचा गुटखा विक्रीसाठी ठेवला होता.
पोलिसांनी तो जप्त करीत जगदीश कायस्थ याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितास अटक करण्यात आली आहे. तपास फौजदार गणेश सूर्यवंशी करीत आहे.