नवापूर व दहिदुले येथून ४६ हजार रुपयांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:30 IST2021-03-06T04:30:02+5:302021-03-06T04:30:02+5:30

नंदुरबार : दहिंदुले, ता.नंदुरबार व नवापूर येथून ४६ हजार ८०० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा ...

Gutka worth Rs 46,000 seized from Navapur and Dahidule | नवापूर व दहिदुले येथून ४६ हजार रुपयांचा गुटखा जप्त

नवापूर व दहिदुले येथून ४६ हजार रुपयांचा गुटखा जप्त

नंदुरबार : दहिंदुले, ता.नंदुरबार व नवापूर येथून ४६ हजार ८०० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनुसार, दहिंदुले, ता.नंदुरबार येथे सार्वजनिक जागी राजेश शामलाल सिंधी, रा.सिंधी कॅालनी हा गुटखा बाळगतांना आढळून आला. पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे १५ हजार ६६३ रुपयांचा गुटखा आढळून आला. याबाबत पोलीस नाईक जितेंद्र तांबोळी यांनी फिर्याद दिल्याने राजेश सिंधी याच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार चौधरी करीत आहे.

दुसरी घटना नवापूर येथे घडली. शहरातील फकीरचंद जलकुंभाजवळ एकाजवळ गुटखा असल्याची माहिती मिळाल्यावर एलसीबीच्या पोलिसांनी तेथे जाऊन तपासणी केली. तेथे संशयितरित्या उभा असलेल्या चेलाराम गोबरराम पटेल, रा.नारायणपूर, नवापूर याची झडती घेतली असता त्याच्याकडे ३१ हजार २०० रुपयांचा गुटखा आढळून आला. याबाबत पोलीस कर्मचारी जितेंद्र तोरवणे यांनी फिर्याद दिल्याने चेलाराम गोबरराम पटेल याच्याविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार पठाण करीत आहे.

दरम्यान, जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री सुरू असतांना अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे कुठलीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे अवैध गुटखा विक्रेत्यांचे फावले आहे.

Web Title: Gutka worth Rs 46,000 seized from Navapur and Dahidule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.