हिंदु सेवा सहाय्य समितीच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:27 IST2021-07-26T04:27:59+5:302021-07-26T04:27:59+5:30
सर्वप्रथम परात्पर गुरू डॉ.जयंत आठवले यांच्या प्रतिमेचे शास्त्रोक्त पद्धतीने विधिवत पूजन हेमंत राजपूत व विश्वनाथ कदम या दाम्पत्यांनी ...

हिंदु सेवा सहाय्य समितीच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव
सर्वप्रथम परात्पर गुरू डॉ.जयंत आठवले यांच्या प्रतिमेचे शास्त्रोक्त पद्धतीने विधिवत पूजन हेमंत राजपूत व विश्वनाथ कदम या दाम्पत्यांनी केले. तद्थनंतर गौमतेचे पूजन डॉ. आकाश पवार, आरोग्य अधिकारी कांबळी, अरिहंत गौशाळेचे दिलीप जैन, आकाश जैन, विनोद जैन यांनी केले. तसेच मोकाट व आजारी गुरांवर रात्री-अपरात्री उपचार करणारे डॉक्टर, गौशाळेत झोकून देऊन गौसेवा करणारे सेवेकरी तसेच शहरात मृत गोवंशावर अंत्यविधी करणारे नगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वेळी जीवनातील आपले पहिले गुरू माता- पिता यांचेही पाद्यपूजन करण्यात आले. या वेळी प्रातिनिधिक स्वरूपात काही आई-वडिलांचा त्यांच्या मुला-मुलींनी पूजन करून कृतज्ञता व्यक्त केली. रवींद्र पाठक महाराज यांनी जीवनात गुरूंचे महत्त्व याविषयावर उपस्थिनांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक नरेंद्र पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सुमित परदेशी तर आभार पंकज डाबी यांनी मानले. कार्यक्रमासाठी राजू चौधरी, मयूर चौधरी, जितू मराठे, सुयोग सूर्यवंशी, जितेंद्र राजपूत, गणेश राजपूत, कपिल चौधरी, उज्ज्वल राजपूत, अमोल ठाकरे, आकाश गावीत यांनी परिश्रम घेतले.