गुरू रविदास नोकरदार मैत्री संघातर्फे सेवानिवृत्तांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:34 IST2021-08-12T04:34:11+5:302021-08-12T04:34:11+5:30
येथील नगरपालिका सभागृहात घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी.टी. पाटील महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य अशोक शेवाळे तर प्रमुख अतिथी म्हणून अक्कलकुवा ...

गुरू रविदास नोकरदार मैत्री संघातर्फे सेवानिवृत्तांचा सन्मान
येथील नगरपालिका सभागृहात घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी.टी. पाटील महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य अशोक शेवाळे तर प्रमुख अतिथी म्हणून अक्कलकुवा येथील प्रभारी गटविकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी शांतीलाल शिंदे, ओंकार शेवाळे उपस्थित होते. कार्यक्रमात शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या १६ सेवानिवृत्त चर्मकार समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला. सामाजिक उपक्रम तन्मयतेने राबविण्यासाठी अक्कलकुवा पं.स.चे प्रभारी गटविकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांनी एक लाख रुपयांची सामाजिक भेट अर्पण केली. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षित वर्गाच्या दातृत्व भावातून समाज उन्नतीला प्रेरणा मिळत असते, अशी भावना त्यांनी या वेळी व्यक्त केली. प्रा.अशोक शेवाळे यांनी चर्मकार समाजातून खडतर परिस्थितीत ज्ञानार्जन केलेली पिढी सेवानिवृत्त होत आहे. या कर्तव्यमूर्तींचा सन्मान समाजाने केला तरच येणाऱ्या पिढ्या ज्येष्ठांप्रती आदर निर्माण करतील, असे सांगितले.
ईशस्तवन व रविदास वंदना गीत संगीत शिक्षक बाळू सावंत यांनी म्हटले. प्रस्ताविक नोकरदार संघाचे अध्यक्ष केशव राजभोज यांनी केले. सूत्रसंचालन संघटनेचे उपाध्यक्ष श्री सुभाष सावंत यांनी तर आभार संघटक नानासाहेब अहिरे यांनी मानले. कार्यक्रमासाठीचेतन गांगुर्डे, संजय बोरसे, प्रवीण भामरे, किशोर महाले, नंदलाल वसईकर, दिनेश बागूल, सुनील गांगुर्डे, प्रकाश महाले, नामदेव शेवाळे, विजय शेवाळे आदींनी परिश्रम घेतले.