गुजरभवालीत पाणी अडवा पाणी जिरवा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 13:04 IST2020-01-14T13:04:12+5:302020-01-14T13:04:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पाण्यासाठी वणवण थांबविण्यासाठी के.डी.गावीत विद्यालय गुजरभवाली ता.नंदुरबार येथील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांमार्फत ‘पाणी अडवा - ...

Gujrabhavali Water or Water activities | गुजरभवालीत पाणी अडवा पाणी जिरवा उपक्रम

गुजरभवालीत पाणी अडवा पाणी जिरवा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पाण्यासाठी वणवण थांबविण्यासाठी के.डी.गावीत विद्यालय गुजरभवाली ता.नंदुरबार येथील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांमार्फत ‘पाणी अडवा - पाणी जिरवा’ उपक्रम राबविण्यात आला.
यंदाच्या पावसाळ्यात अपेक्षेनुसार पाऊस झाला असला तरी पाण्यासाठी वणवण टळेल याची शाश्वती देता येत नाही. त्यासाठी पाण्याच्या थेंब न् थेंब वाचविण्याची आवश्यकता आहे. ही काळाची गरज ओळखून व आदिवासी देवमोगरा एज्युकेश न सोसायटीचे चेमरमन राजेंद्रकुमार गावीत यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून गुजरभवाली येथे विविध उपक्रम राबविण्यात येतआहे. त्यात स्वच्छता अभियान व पाणी अडवा, पाणी जिरवा यासह अन्य उपक्रमांचा समावेश आहे.
पाण्यासाठी दाहीदिशा किंवा दुष्काळ परिस्थिती पाहून पाणी अडवा, पाणी जिरवा हा उपक्रम राबविला जातो. खरे तर हा उपक्रम शाळांच्या माध्यमातून राबविला जातो. त्यानुसार के.डी.गावीत विद्यालय गुजरभवालीने शिवण नदीवर हा उपक्रम राबविला. यावेळी मुख्याध्यापक घनश्याम पाडवी, शरद जाधव, रवींद्र पवार, देविदास राजपूत, राकेश पाटील, विजयसिंग वळवी, भानुदास पाटील, सुरेश माळी, हिरालाल पाटील, रवींद्र शिरसाळे, हेमराज कोकणी, सविता पाटील व सोनवणे आदी उपस्थित होते.

४ग्लोबल वॉर्मिग, पर्यावरण असंतुलन, जंगलतोड, पृथ्वीच्या पोटातील कैक किलोमीटर खोलवर जाणाºया कोळसा व इतर खनिजांच्या खाणी या रूपाने पृथ्वीवर अत्याचार होत आहे. त्यात भर म्हणून आणखीन कूपनलिकांच्या रूपाने डोके वर काढत आहे.
प्रत्येकजण वैयक्तिक स्वार्थासाठी आपापल्या जागेत बोअरिंग विहिरी मारतात. त्यामुळे पृथ्वीच्या पोटातील पाण्याची पातळी खूपच खालावली आहे. सध्या तर पाचशे फूटांपासून एक हजार फूटापर्यंत बोअरिंग केले जातात. यातून पृथ्वीच्या पोटातून पाण्याचा प्रचंड प्रमाणात उपसा सुरू आहे.
अशा प्रकारामुळे पाण्याची पातळी खाली जाते, तसेच विहिरीतील झरे मार्ग बदलतात, एवढेच नव्हे तर त्यामुळे पृथ्वीच्या पोटातील गारवा कमीकमी होत आहे. त्याचा परिणाम पृथ्वीवरील हवामान, ऋतू, वातावरण बदलत आहेत.
अवेळी पाऊस, गारपीट, थंडी, वादळी वारे, धुळीची वादळे, महापूर यांसारख्या अनियमित गोष्टी सातत्याने घडत आहेत. बोअरिंग विहिरीमुळे विहिरींचे झरे आटत असून पाण्याचे मार्गदेखील बदलतात. पाण्याचे विदारक चित्र उभे राहिले आहे, अशा धोक्यांवर मात करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

Web Title: Gujrabhavali Water or Water activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.