झामणझर येथील चोरीप्रकरणी संशयितास गुजरातमधून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:29 IST2021-05-16T04:29:43+5:302021-05-16T04:29:43+5:30

नंदुरबार : झामणझर (ता. नवापूर) येथे मार्च महिन्यात झालेल्या चोरीप्रकरणी संशयितास ताब्यात घेऊन त्याच्याकडून तीन लाख ६२ हजार रुपयांचा ...

Gujarat suspect arrested in Jamanjar burglary case | झामणझर येथील चोरीप्रकरणी संशयितास गुजरातमधून अटक

झामणझर येथील चोरीप्रकरणी संशयितास गुजरातमधून अटक

नंदुरबार : झामणझर (ता. नवापूर) येथे मार्च महिन्यात झालेल्या चोरीप्रकरणी संशयितास ताब्यात घेऊन त्याच्याकडून तीन लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयिताना गुजरातमधील महुवा येथून अटक करण्यात आली आहे.

कौशलभाई सुरेशभाई ओड (रा. महुवा, गुजरात) असे संशयिताचे नाव आहे. झामणझर (ता. नवापूर) येथे २९ मार्च रोजी महेशभाई मंजीभाई प्रजापती यांच्या घरात चोरी झाली होती. चोरट्यांनी घराच्या पश्चिम बाजूस असलेल्या भिंतीच्या विटा काढून घरात प्रवेश केला होता. लोखंडी गोदरेज कपाट उघडून सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण तीन लाख ६२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणणेबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना सूचना केल्या होत्या.

त्यानुसार विजयसिंग राजपूत यांनी पोलीस कर्मचारी जितेंद्र ठाकूर, जितेंद्र तोरवणे, मोहन ढमढेरे यांचे पथक स्थापून गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. हा गुन्हा ग्रामीण भागात, तसेच राज्याचे सीमावर्ती परिसरात घडलेला असल्याने तपासासाठी आव्हानात्मक होता. नेमलेल्या पथकाने आरोपी गुजरात राज्यातील माहुवा (हातावाडफळी) येथील असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहिती मिळाल्यापासुन पोलीस पथक आरोपीच्या मागावर होते. आरोपी चालाखीने पोलीस पथकास गुंगारा देत होता. १३ मे रोजी आरोपी त्याचे राहाते गावी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने वेशांतर करून संशयिताच्या गावाच्या शिवारात सापळा लावून माग काढून शिताफीने ताब्यात घेतले. आरोपी कौशलभाई सुरेशभाई ओड यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देऊन गुन्ह्यात चोरी केलेला तीन लाख ६२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल काढून दिला. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याने मुद्देमालासह आरोपीस पुढील तपासकामी नवापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, विजयसिंह राजपूत, कर्मचारी जितेंद्र ठाकूर, जितेंद्र तोरवणे, मोहन ढमढेरे यांच्या पथकाने पार पाडली.

Web Title: Gujarat suspect arrested in Jamanjar burglary case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.