तळोद्यात अनिसतर्फे युवक-युवतींना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 11:35 IST2019-09-11T11:35:46+5:302019-09-11T11:35:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समिती व तळोदा वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने जोडीदाराची ...

तळोद्यात अनिसतर्फे युवक-युवतींना मार्गदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समिती व तळोदा वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने जोडीदाराची विवेकी निवड संवाद शाळा घेण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन सिनेट सदस्य प्रा.डॉ.एस.आर. गोसावी यांनी केले. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.एस.आर. मगरे होते. कार्यक्रमाला अंधश्रद्धा निमरूलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.देविदास शेंडे, प्रा.जयपाल शिंदे, प्रा.डॉ.प्रशांत बोबडे, प्रा.राजू यशोद, प्रा.गौतम मोरे, मंगलसिंग पाटीलसह कार्यक्रम अधिकारी प्रा.सोनवणे विद्यार्थी विकास विभागाचे प्रा.मुकेश जावरे डॉ.गायकवाड, संतोष केदार, अधीक्षक योगेश्वर पंजाराळे, प्रा.साहेबराव चव्हाण, अनिल निकम, सतिलाल पाडवी, अशोक धानका उपस्थित होते.
भविष्यातील विवाह इच्छूक युवक-युवती व त्यांच्या पालकांसाठी लग्न संबंध जुळवताना समाजातील घटकांचा आदर करत विवेकी मापदंडाचा वापर करून दोन कुटुंबातील आचार-विचार, संस्कार, विवेक यांना महत्त्व देऊन लग्न जुळवण्याची गरज आहे. विवेक पद्धतीने लग्न केल्यामुळे जोडीदारातील परस्पर विसंवाद, मानपानामुळे घटस्फोटांचे प्रमाण वाढत आहे. याची कारणे आधीच तपासून घेतली तर घटस्पोट होण्याची वेळ येणार नाही. यासाठी जोडीदाराची विवेकी निवड विभाग महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समितीने सुरू केला आहे.
कार्यक्रमात पनवेल येथील संवादक आरती नाईक व सचिन थेटे यांनी लग्न जुळवताना युवक-युवती व पालकांनी कोणकोणते विवेक तपासून घ्यायला हवेत कोणकोणत्या बाबींना महत्त्व द्यावे, याचे सखोल वैज्ञानिक मार्गदर्शन केले. शहरासह तालुक्यातील 200 युवक-युवतींनी या कार्यशाळेत सहभाग नोंदविला. संवाद सहभागी युवक-युवतींनी मार्गदर्शकांसोबत संवाद साधत मते मांडली. यात नीलेश पावरा याने गट चर्चे दरम्यान, जोडीदाराची निवड करत असताना जोडीदारांच्या वयामध्ये मोठय़ा प्रमाणावर तफावत आढळून येते आणि त्यामुळे परस्पर विचार जुळून येत नाही. या माध्यमाने बालविवाह ही मोठय़ा प्रमाणावर होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. सहभागी शिबिरार्थी सोनाली कोकणी यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक राज्य सरचिटणीस विनायक सावळे तर सूत्रसंचालन तळोदा कार्याध्यक्ष मुकेश कापुरे यांनी केले. कार्यक्रमासाठी तळोदा अनिसच्या पदाधिकारी व कार्यकत्र्यानी परिश्रम घेतले.