अंनिसतर्फे मार्गदर्शन कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 13:08 IST2020-01-14T13:08:09+5:302020-01-14T13:08:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्या संयुक्त विद्यमाने वैज्ञानिक ...

Guidance workshop by Annie | अंनिसतर्फे मार्गदर्शन कार्यशाळा

अंनिसतर्फे मार्गदर्शन कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्या संयुक्त विद्यमाने वैज्ञानिक जाणिवा प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले़ शिबिरात नंदुरबार तालुक्यातील ९१ जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षिकांनी उपस्थित दिली़
अध्यक्षस्थानी डॉ़ प्रसाद सोनार हे होते़ शिबिराचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी, डायटचय अधिक्षिका मिनाक्षी गिरी, मुख्याध्यापक रुपेश चौधरी, अंनिसचे राज्य उपाध्यक्ष शांतीलाल शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले़ शिबिराच्या पहिल्या सत्रात वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे काय, त्याचा प्रचार, प्रसार व अंगीकार या विषयावर किर्तीवर्धन तायडे यांनी मार्गदर्शन केले़ मन मनाचे आजार आणि अंगात येणे या विषयावर वसंत वळवी यांनी, स्त्रिया आणि अंधश्रद्धा या विषयावर बलदेव वसईकर यांनी मार्गदर्शन केले़ शिबिराच्या चौथ्या सत्रात चमत्कार सादरीकरण व त्या मागील विज्ञान यावर किर्तीवर्धन तायडे व वसंत वळवी यांनी सादरीकरण केले़ त्याला उपस्थित शिक्षिकांसह समितीच्या कार्यकर्त्यांनी दाद दिली़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिनाक्षी भदाणे यांनी केले.
शिबिर यशस्वीतेसाठी सूर्यकांत आगळे, मिनाक्षी आगळे, रेखा तायडे व प्रविण धांद्रे, दिपक चौधरी व वंदना चौधरी यांनी परिश्रम घेतले़
शिबिर समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अस्थिरोग तज्ञ डॉ.सी.डी. महाजन होते़ प्रमुख अतिथी म्हणून डॉ.राजकुमार पाटील, स्त्रीरोगतज्ञ डॉ.वृषाली पाटील उपस्थित होत्या़ डॉ़वृषाली पाटील यांनी मासिक पाळी व अंधश्रद्धा विषयावर मार्गदर्शन केले़ महेंद्र फटकाळ व शांतीलाल शिंदे यांनीही उपस्थित शिक्षिकांसोबत सवांद साधत मार्गदर्शन केले़

Web Title: Guidance workshop by Annie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.