कृषी जागरूकतेंतर्गत धानोरा येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:33 IST2021-08-28T04:33:51+5:302021-08-28T04:33:51+5:30
या कार्यक्रमांतर्गत शहादा येथील के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी सोनाली अनिल इंदीस हिने विविध प्रकारचे रोपे तयार करून ...

कृषी जागरूकतेंतर्गत धानोरा येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
या कार्यक्रमांतर्गत शहादा येथील के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी सोनाली अनिल इंदीस हिने विविध प्रकारचे रोपे तयार करून त्यांचे संवर्धन करून झाडे जगविण्यासह शेतात २ × २ × २ प्रमाणे खड्डा खोदून खड्ड्यात शास्त्रीय पद्धतीने युरिया व सेंद्रिय खत यांचा वापर करण्यास सांगितले.
यावेळी गावातील माजी सरपंच मोहन ठाकरे व शेतकरी बांधव हजर होते. दरम्यान, या कार्यक्रमांतर्गत तळोदा तालुक्यातील मोरवड येथील शेतकऱ्यांना कापूस पिकावरील पानांवर येणाऱ्या बुरशी व बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रासायनिक कीटकनाशक फवारणी शास्त्रीय पद्धतीने करून कृतिशील मार्गदर्शन केले. यावेळी गावातील शेतकरी सोमनाथ पाटील, सीताराम पाटील व इतर शेतकरी बांधव हजर होते. तसेच तळोदा येथील वनसंरक्षक रोपवाटिकेत जाऊन तिने विविध वनस्पतीचे रोपे तयार करताना मातीमिश्रित सेंद्रिय खत ट्रेमध्ये भरून त्यात बियापासून रोपे तयार कशी करायची याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. या उपक्रमासाठी शहादा कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एल. पटेल आणि सहकारी प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.