कृषी तंत्रज्ञान महोत्सवात कापूस पिकावर मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 12:33 IST2020-11-07T12:32:41+5:302020-11-07T12:33:00+5:30
n लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कापूस पिकाचे अधिकाधीक उत्पादन घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी ...

कृषी तंत्रज्ञान महोत्सवात कापूस पिकावर मार्गदर्शन
n लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कापूस पिकाचे अधिकाधीक उत्पादन घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असे आवाहन कृषी तंत्रज्ञान महोत्सवात करण्यात आले.
कृषी विज्ञान केंद्र कोळदा,नंदुरबार येथे सुरू असलेल्या १४ व्या कृषी तंत्रज्ञान महोत्सवात कापूस उत्पादक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेत ऑनलाइन मार्गदर्शन करताना डॉ. वाय. जी. प्रसाद, संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांनी गुलाबी बोंडअळी आणि बोंडसड हे कापसातील सद्यस्थितीत समस्या असून त्यांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करण्याचे आवाहन केले. तसेच कापूस उत्पादक परिषदेचे अध्यक्ष डॉ. नितीन पंचभाई, सचिव, डॉ. हेडगेवार सेवा समिती, नंदुरबार यांनी जिल्ह्यातील एक तृतीयांश क्षेत्रावर घेतल्या जाणाऱ्या कापूस पिकाच्या माहितीसाठी या परिषदेच्या उपयोग करण्याचे आवाहन केले.
कापूस उत्पादक परिषदेत डॉ. नितीन पंचभाई, डॉ वाय. जी. प्रसाद, डॉ चींन्ना बाबु नायक शास्त्रज्ञ सीआयसीआर, नागपूर, डॉ. स्मिता सोळंकी, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आदी मान्यवरांनी ऑनलाइन पद्धतीने तसेच डॉ. मुरलीधर महाजन, कृषी विद्यावेत्ता, विभागीय विस्तार केंद्र धुळे, प्रदीप लाटे, कृषि विकास अधिकारी,जिल्हा परिषद,नंदुरबार, डॉ. व्ही बी देवरे, डॉ. वाय.एस. सैंदाणे, कीटकशास्त्रज्ञ, कीटकशास्त्र विभाग म.फु.कृ.वि,राहुरी यांनी प्रत्यक्ष उपस्थिती होती.
परिषदेचे प्रास्ताविक करताना पी.सी कुंदे, विषय तज्ञ, पिक संरक्षण, कृषी विज्ञान केंद्र, कोळदा यांनी कापसाची सद्यस्थिती व रोग किडीचा प्रादुर्भाव उपस्थितांसमोर विषद केला. डॉ. चींन्ना बाबु नायक यांनी गुलाबी बोंड आळी नियंत्रणासाठी सद्यस्थितीत करावयाच्या उपाययोजना याबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. स्मिता सोलंकी यांनी बैलचलित अवजारे याविषयीची मार्गदर्शन ऑनलाइन द्वारे केले.
परिषदेत उपस्थित डॉ. मुरलीधर महाजन यांनी कापूस पीक उत्पादन चांगले येण्यासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान उपस्थितांसमोर मांडले व गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनासाठी डिसेंबर अखेर कापूस काढून टाकण्याचे आवाहन उपस्थितांना केले. डॉ. व्ही बी देवरे यांनी कापसातील कीड व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले तसेच डॉ. वाय एस.सैंदाणे यांनी कीटकनाशकांची सुरक्षित हाताळणी याविषयी मार्गदर्शन केले. प्रदीप लाटे,कृषि विकास अधिकारी,जिल्हा परिषद,नंदुरबार यांनी हस्ते कापूस पिक परिषदेचा समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.सी कुंदे व आभार प्रदर्शन यु.डी.पाटील यांनी केले. परिषद यशस्वी करण्यासाठी जयंत उत्तरवार, आरती देशमुख, सचिन फड राजेश भावसार, विजय बागल, डॉ. महेश गणापुरे,गिता कदम, रजेसिंग राजपूत, किरण मराठे, राहुल नवले, कमल किशोर देशमुख आदींनी परिश्रम घेतले