नवापूर तालुक्यात शेतकऱ्यांसाठी कापूस पिकाबाबत मार्गदर्शन अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:21 IST2021-06-11T04:21:25+5:302021-06-11T04:21:25+5:30

या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य शैलेश वसावे, माजी सरपंच राजू गोमा वसावे यांच्या हस्ते हिरवी झेंडी ...

Guidance campaign on cotton crop for farmers in Navapur taluka | नवापूर तालुक्यात शेतकऱ्यांसाठी कापूस पिकाबाबत मार्गदर्शन अभियान

नवापूर तालुक्यात शेतकऱ्यांसाठी कापूस पिकाबाबत मार्गदर्शन अभियान

या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य शैलेश वसावे, माजी सरपंच राजू गोमा वसावे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखून करण्यात आला. नंदुरबार २ वर्षांपासून कापूस पिकाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुधारित कापूस आदर्श पद्धती बीसीआय, जीआयझेडअंतर्गत प्रकल्प राबविण्यात येत आहे. यात कापूस पीक लागवड करणाऱ्या गावातील शेतकऱ्यांना सुधारित कापूस शेतकरी मार्गदर्शिका व खताविषयी माहितीपत्रकांचे वाटप करण्यात येते. नवापूर तालुक्यातील ६९ गांवामध्ये १ हजार १८ शेतकऱ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचवण्यात आला आहे. यात बियाणे, खते, बालमजूर, आरोग्य, फवारणी करताना घ्यावयाची काळजी, बियाणे खरेदी करताना पक्के बिल घेणे, कीटकनाशकासोबत दिलेल्या माहितीचे पालन करणे, जनतेच्या हितासाठी कोरोना लसीकरण व त्याची काळजी कशी घ्यावी, शेतीच्या कामात बालमजूर कायद्याने प्रतिबंध आहे. फवारणीच्या औषधांचे कॉकटेल, करू नका तसेच बीसीआयच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रकल्पातील शेतकऱ्यांनी कापूस बियाणाची उगवण क्षमता वाढवण्यासाठी, तसेच कीड रोगापासून नियंत्रण होण्याकरिता बीजप्रक्रियेचे महत्त्व पटवून सांगण्यात आले. अभियानामुळे शेतकऱ्यांना शेतीचे शाश्वत उत्पादन सुलभ पद्धतीने करण्याची माहिती मिळणार आहे. लुपिन फाउंडेशनचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक योगेश राऊत, प्रकल्प व्यवस्थापक लक्ष्मण खोसे, प्रकल्प प्रमुख सुनील सैंदाणे, प्रशिक्षण समन्वयक दीपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राबण्यात आला. चिंचपाडा व विसरवाडी येथील कृषिमित्रांनी परिश्रम घेतले.

Web Title: Guidance campaign on cotton crop for farmers in Navapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.