कृषिपंप वीज धोरणाबाबत मार्गदर्शन शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:11 IST2021-02-05T08:11:59+5:302021-02-05T08:11:59+5:30

यावेळी सरपंच सुदाम ठाकरे, उपसरपंच भरत पाटील, तलाठी धर्मा चौधरी, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र भोई, माजी सरपंच भावडू ठाकरे व ...

Guidance camp on agricultural pump power policy | कृषिपंप वीज धोरणाबाबत मार्गदर्शन शिबिर

कृषिपंप वीज धोरणाबाबत मार्गदर्शन शिबिर

यावेळी सरपंच सुदाम ठाकरे, उपसरपंच भरत पाटील, तलाठी धर्मा चौधरी, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र भोई, माजी सरपंच भावडू ठाकरे व शेतकरी उपस्थित होते. सहायक अभियंता पाटील यांनी कृषिपंप वीज धोरणाविषयी माहिती देताना सांगितले की, ३० मीटरच्या आत सर्व कृषी पंपधारकांना तत्काळ वीज कनेक्शन मिळेल, ज्या कृषिपंप अर्जदाराचे अंतर लघुदाब वाहिनीच्या २०० मीटर आहे व रोहित्रावर पर्याप्त क्षमता उपलब्ध आहे. अशा नवीन कृषिपंप ग्राहकांना एरियल बॅच केबलद्वारे तीन महिन्यांत नवीन वीज जोडणी मिळेल. अर्जदार आर्थिक कारणामुळे खर्च करण्यास सक्षम नसेल तर त्याला अर्जदारांच्या क्रमवारीनुसार व निधीच्या उपलब्धतेनुसार वीज जोडणी देण्यात येईल. २०० ते ६०० मीटरच्या आत असलेल्या कृषी ग्राहकांना उच्चदाब वितरण प्रणालीचा पर्याय असेल व ६०० मीटरच्या पुढे अंतर असलेल्या अर्जदारांना पारेषण विरहित सौरऊर्जेवरील पंपाचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल. कृषी अर्जदाराचे सर्व व्यवहार ऑनलाईन पद्धतीनेही करण्यात येईल. अर्जदाराचा वीज बिलावरी थकबाकीचा तपशील महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. वीज बिलाबाबत तक्रार असल्यास मागील पाच वर्षांपर्यंतच्या बिलाची दुरुस्ती उपविभागीय कार्यालयामार्फत केली जाईल. जुन्या थकबाकीवर पाच वर्षांपूर्वी म्हणजे सप्टेंबर २०१५ पूर्वीच्या थकबाकीवरील विलंब आकार व व्याज माफ करण्यात येईल. भारतीय सेनेमधील आजी व माजी सैनिक, अधिकारी यांना वीजपुरवठा देताना प्राधान्य देण्यात येईल. एस.सी., एस.टी., ओबीसी, अल्पसंख्याक प्रवर्गातील कृषीपंपधारकांना नवीन जोडणी देण्यासाठी संबंधित विभागांनी (एससीपी, टीएसपी) महाज्योती, आदी योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

नंदुरबारचे अधीक्षक अभियंता ए. एन. बोरसे, शहाद्याचे कार्यकारी अभियंता के. डी. पावरा, उपकार्यकारी अभियंता भूषण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशा येथील सहायक अभियंता आर. एन. पाटील व कर्मचाऱ्यांनी शिबिरासाठी परिश्रम घेतले. प्रकाशा अंतर्गत येणारे डामरखेडा, नांदरखेडा, करजई, बुपकरी, पळासवाडा, करणखेडा, वैजाली, काथरदा, नांदर्डे, आदी गावांतील शेतकऱ्यांनीही या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

Web Title: Guidance camp on agricultural pump power policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.