Gudipadva grief at Mhaswad | म्हसावद येथे गुढीपाडवा दु:खात

म्हसावद येथे गुढीपाडवा दु:खात

म्हसावद गावात कोरोना सदृश लक्षणे, कोरोनाबाधित, इतर कारणांनी मृतांची संख्या वाढली आहे. गावात सर्वच समाजातील व्यक्ती गेल्या बारा दिवसाच्या आत मृत झाल्या आहेत. यात गुर्जर, धनगर, कोळी, गिरासे, राजपूत, वाणी, सोनार, दलित, मुस्लीम, आदिवासी, जयस्वाल, न्हावी यांचा समावेश असून जवळपास सर्वच गाव सुतकी झाले आहे. आई, वडील, भाऊ, बहीण, रक्त, नातेसंबंधातील व्यक्ती, घरातील वयस्क व्यक्तीचे निधन झाल्याने दारासमोर तोरण नाही की गुढी उभारण्यात आली नाही. गुढीपाडवा वर्षारंभीचा आनंदाचा सण असतो. मात्र गावच सुतकी झाल्याने दुःखाचे सावट पसरले आहे. सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. प्रथमच म्हसावद गावावर ही वेळ आली आहे. खेड्यापाड्यावरून औषधोपचारासाठी मोठ्या संख्येने रुग्ण येत आहेत. रुग्णांना बेड मिळत नाहीत. खासगी दवाखान्यात रुग्णांची गर्दी फुल्ल झाली आहे. मात्र आरोग्य विभागाचा ठावठिकाणा नाही. आरोग्य विभाग सुस्त झाला आहे. एकंदरीत आरोग्य विभागाचे नियोजन कोलमडल्यागत झाले आहे.

Web Title: Gudipadva grief at Mhaswad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.