नंदुरबारातील बाजारपेठेवर ‘गुढीपाडवा फिव्हर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 11:20 IST2019-04-06T11:20:00+5:302019-04-06T11:20:12+5:30
नंदुरबार : मराठी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिक सज्ज झाले असून परिणामी बाजारपेठेत तेजी आली आहे़ शुक्रवारी संसारोपयोगी साधनांसह, ईलेक्ट्रॉनिक ...

नंदुरबारातील बाजारपेठेवर ‘गुढीपाडवा फिव्हर’
नंदुरबार : मराठी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिक सज्ज झाले असून परिणामी बाजारपेठेत तेजी आली आहे़ शुक्रवारी संसारोपयोगी साधनांसह, ईलेक्ट्रॉनिक वस्तू, दुचाकी, चारचाकी वाहने, सोने-चांदी बाजारात मोठी उलाढाल झाली़ बाजारातील या चैतन्यमयी सुरुवातीने व्यापारी वर्गही सुखावला होता़
जिल्ह्यात दुष्काळी स्थितीमुळे दिवाळीपासून बाजारावर अवकळा पसरली होती़ परिणामी गेल्या चार महिन्यात बाजार सुस्तावला होता़ यातून उलाढालीवर परिणाम झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंता होती़ गुढीपाडवा हा महत्त्वपूर्ण उत्सव मानला जात असल्याने नागरिकांकडून प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती़ ही अपेक्षा बऱ्याचअंशी खरी ठरली असून ईलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीला मोठा बुस्टर मिळाल्याचे बाजारातील बुकींगवरुन स्पष्ट झाले होते़ केंद्र शासनाने यंदाच्या बजेटमध्ये चारचाकी वाहनांच्या किमती वाढवल्या होत्या़ १ एप्रिलपासून नवीन किमती लागू झाल्या असल्या तरी त्यापूर्वीच बºयाच जणांनी बुकींग करुन ठेवल्याने वाहनबाजारातील मंदी काहीशी दूर झाल्याचे चित्र आहे़ गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला विविध ब्रँडच्या चारचाकी वाहनांच्या शोरुममधून २० वाहने बाहेर पडली होती़ गुढीपाडव्यालाही किमान ३५ ते ४० वाहनांची डिलीव्हरी होणार असून ऐनवेळी येणाºया ग्राहकांसाठी शोरुम चालकांकडून सोय करुन ठेवली गेल्याचे सांगण्यात आले आहे़ शहरातील होम अप्लायन्सेस विक्रेत्यांकडे गेल्या आठवड्यापासून २०० जणांनी विविध वस्तंूची बुकींग करुन ठेवली होती़ यात फ्रीज, कुलर आणि एअर कंडीशन यांची सर्वाधिक संख्या होती़ हे सर्व बुकींग शुक्रवारीच निकाली काढण्यात आले़ तर नेहरु चौकातील काही दुकानांमध्ये सायंकाळपर्यंत ४० ग्राहकांना फ्रिज आणि कुलरची खरेदी केली होती़ फायनान्स आणि रोख या स्वरुपात ही खरेदी झाली़
शहरातील शोरुमधून ३० सेडान आणि हॅचबॅक सिरीज कारसह सेव्हन सिटर वाहनांची विक्री झाली़ शहरातील एका शोरुमधून एसयुव्ही श्रेणीतील ४ वाहनांची विक्री झाली़ सोबत मालवाहू आणि रिक्षा दर्जाच्या १० वाहनांची बुकींग झाल्याचे सांगण्यात आले़ मोठ्या वाहन बाजारात गेल्या आठवड्यापासून ६५ पेक्षा अधिक वाहनांची बुकींग आणि विक्री झाली़
दुचाकी शोरुम्समध्येही शुक्रवारी सकाळपासून उत्साह होता़ स्कूटर दर्जाच्या वाहनांना सर्वाधिक पसंती असल्याचे यंदाही बुकींगरवरुन स्पष्ट झाले़ १६० ग्राहक गुरुवारपासून आपल्या हक्काची गाडी घेऊन गेले़ तर दुसरीकडे मोटारसायकल दर्जाची २०० वाहने बुक झाल्याची माहिती देण्यात आली़ गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला मंगळबाजार आणि सुभाष चौकात खरेदीसाठी बºयापैकी गर्दी होती़ बाजारात रात्री उशिरापर्यंत उलाढाल झाल्याची माहिती देण्यात आली़