पालकमंत्री, आमदार आणि अधिकारी शेतक:यांच्या बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 13:15 IST2019-11-04T13:15:44+5:302019-11-04T13:15:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी रविवारी शहादा तालुक्यात ...

Guardian Minister, MLA and Officer Farmer | पालकमंत्री, आमदार आणि अधिकारी शेतक:यांच्या बांधावर

पालकमंत्री, आमदार आणि अधिकारी शेतक:यांच्या बांधावर

लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी रविवारी शहादा तालुक्यात भेट दिली़ यावेळी त्यांच्यासोबत आमदार, प्रशासकीय अधिकारी आणि पदाधिकारी हजर होत़े शेतक:यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्री आमदार व अधिका:यांनी भेट देत नुकसानीची पाहणी केली़      
शहादा तालुक्यातील विविध गावांमध्ये दिलेल्या भेटीनंतर पालकमंत्री रावल यांनी सारंगखेडा ता़ शहादा येथे घेतलेल्या आढावा बैठकीत अधिका:यांना सूचना करुन येत्या शुक्रवार्पयत पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिल़े पंचनामे पूर्ण करण्यात आल्यानंतर शासनाकडे पिकनिहाय नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे सांगून नुकसानीची तात्काळ भरपाई देण्याची कारवाई होणार असल्याचे सांगितल़े 
रविवारी झालेल्या या पाहणी दौ:यावेळी  आमदार राजेश पाडवी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, सहायक जिल्हाधिकारी अविनाश पांडा, नंदुरबारच्या प्रकल्प अधिकारी वसुमना पंत, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील, जिल्हा परिषद सदस्य जयपालसिंह रावल, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. एन. पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ. चेतन गिरासे, तहसीलदार मिलींद कुलकर्णी, क़ेडी़पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ़ किशोर पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी व्ही़बी़ जोशी यांच्यासह सर्व तहसीलदार, कृषी, महसूल विभाग, बँका आणि सहकारी संस्थांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री रावल यांनी शहादा तालुक्यातील कळंबू, अनरद, वरूळ, मंदाणे, डोंगरगाव, दुधखेडायेथील शेतशिवारात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत शेतक:यांसोबत संवाद साधला़ शेतक:यांनी पिकांची स्थिती सांगून भरपाईची मागणी केली़ 

सारंगखेडा येथील दत्त मंदिर सभागृहात पालकमंत्री रावल यांनी आढावा बैठक घेतली़ यात महसूल आणि कृषी विभागाच्या अधिका:यांनी शुक्रवार्पयत पंचनामे पूर्ण करुन भरपाईचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या, तसेच पाच दिवसात पंचनामे पूर्ण करण्यात आल्यानंतर शनिवारी ग्रामसभा घेऊन चावडी वाचन करण्याचे सूचित केल़े चावडी वाचनाचा अहवाल 10 रोजी द्यावा, पिकनिहाय पंचनामे करावे, विमा कंपन्यांनी शेतक:यांना लाभ द्यावा, तहसीलदार यांच्या मार्गदर्शनात कृषी, ग्रामविकास, महसूल अशा अधिकारी कर्मचा:यांची पथके तयार पंचनाम्यांना गती देण्याचे पालकमंत्री रावल यांनी बैठकीत सांगितल़े तसेच जिल्हाधिकारी यांनी पंचनाम्यांचा दैनंदिन आढावा घेण्याबाबतही ते शवेटी म्हणाल़े बैठकीत उपस्थित विभागप्रमुखांनी अतीवृष्टी आणि अवकाळी पावसाची आकडेवारी सादर करुन नुकसानीचा आढावा आकडेवारीच्या स्वरुपात सांगितला़ बैठकीत अधिका:यांसोबतच शेतकरी व ग्रामस्थांनी हजेरी लावली होती़ यावेळी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचे पैसेच खात्यावर मिळाले नसल्याची तक्रार केली़ यावेळी अधिका:यांनी सारावासारव करत वेळ मारुन नेली़ दरम्यान पालकमंत्री रावल यांनी तहसीलदारांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना केल्या़ 
 

Web Title: Guardian Minister, MLA and Officer Farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.