शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनावर उपचार करणाऱ्या डॅाक्टरांशी साधला पालकमंत्र्यांनी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:24 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री पाडवी यांनी रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी ...

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री पाडवी यांनी रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये आदी उपस्थित होते.

ॲड. पाडवी म्हणाले, जिल्हा रुग्णालयावर नागरिकांचा विश्वास आहे. कोरोना काळात येथील डॉक्टरांनी चांगले परिश्रम घेतले आहेत. हा विश्वास टिकविणे सर्वांची जबाबदारी आहे. डॉक्टरांनी सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येक रुग्णाची तपासणी करावी. गंभीर रुग्णाच्या प्रकृतीकडे रात्रीदेखील विशेष लक्ष देण्यात यावे. रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करताना स्वत:च्या प्रकृतीची काळजीदेखील घ्यावी. रुग्णाचे नातेवाईक कोविड कक्षात येणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले. काही वेळा तपासणीसाठी उशीर झाला असता लक्षणे असताना कोरोना चाचणी निगेटिव्ह येण्याचे प्रसंगी घडत आहेत. अशावेळी नागरिकांनी त्वरित वैद्यकीय सल्ला आणि उपचार घ्यावेत. लक्षणे असताना

घरगुती उपचार करून घरी थांबू नये. डॉक्टरांनी अशा रुग्णांना आजाराची माहिती देऊन त्यांना रुग्णालयात उपचार घेण्यासाठी सांगावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी योग्य नियोजन करून प्रत्येक रुग्णाच्या प्रकृतीकडे लक्ष राहील याची दक्षता घ्यावी. विशेषत: रात्रीच्या वेळी ऑक्सिजन पातळी खालावलेल्या रुग्णांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी, असे डॉ.भारुड म्हणाले.

तत्पूर्वी पालकमंत्र्यांनी नियंत्रण कक्षाला भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. नागरिकांसाठी नियंत्रण कक्ष आणि जिल्हा प्रशासनाने कोविडविषयक माहिती देण्यासाठी तयार केलेले संकेतस्थळ उपयुक्त असल्याचे ते म्हणाले.