ग.तु. पाटील महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवकांचा गुणगौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:38 IST2021-02-25T04:38:41+5:302021-02-25T04:38:41+5:30
हैदराबाद येथील सांस्कृतिक शिबिरातून प्रतीकची दिल्ली येथील पथसंचलनाकरिता निवड झाली होती. दिल्ली येथील एक महिन्याचा प्रशिक्षण सराव पूर्ण झाल्यानंतर ...

ग.तु. पाटील महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवकांचा गुणगौरव
हैदराबाद येथील सांस्कृतिक शिबिरातून प्रतीकची दिल्ली येथील पथसंचलनाकरिता निवड झाली होती. दिल्ली येथील एक महिन्याचा प्रशिक्षण सराव पूर्ण झाल्यानंतर प्रतीकची महाराष्ट्र कॉन्टिजेन्ट म्हणून निवड झाली. महाविद्यालयातून प्रजासत्ताकदिनी पथसंचलनाकरिता निवड झालेला प्रतीक हा तिसरा विद्यार्थी ठरला. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागातून निवड झालेला प्रतीक हा पहिलाच स्वयंसेवक ठरला. गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयाच्या मराठी विभागात कार्यरत असलेले प्रा.डॉ. माधव कदम यांचा तो चिरंजीव आहे. त्याच्या या यशामुळे महाविद्यालयाचे नावलौकिक झाले. त्याचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष मनोज रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. त्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयातील रासेयोच्या एककास प्लेज फॉर लाईफ उपक्रमांतर्गत तंबाखूमुक्त अभियानात सुवर्ण व रौप्य पदक मिळाल्याबद्दल एककाचा सत्कार मनोज रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. समारंभास संस्थेचे समन्वयक डॉ.एम.एस. रघुवंशी, प्राचार्य डॉ.व्ही.एस. श्रीवास्तव, उपप्राचार्य डॉ.आर.आर. कासार, उपप्राचार्य डॉ.एम.जे. रघुवंशी, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा.एन.जे. सोमाणी उपस्थित होते. रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ.अमोल भुयार सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ. दिनेश देवरे, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.संगीता पिंपरे, प्रा.उपेंद्र धगधगे तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व विभागातील प्राध्यापक उपस्थित होते.