जी.टी. पाटील महाविद्यालयात एनसीसी कॅम्पचे उद्‌घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:31 IST2021-02-10T04:31:43+5:302021-02-10T04:31:43+5:30

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार भाऊसाहेब थोरात उपस्थित होते. कॅम्पचे उद्‌घाटन प्राचार्य डॉ.व्ही.एस. श्रीवास्तव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ...

G.T. Inauguration of NCC Camp at Patil College | जी.टी. पाटील महाविद्यालयात एनसीसी कॅम्पचे उद्‌घाटन

जी.टी. पाटील महाविद्यालयात एनसीसी कॅम्पचे उद्‌घाटन

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार भाऊसाहेब थोरात उपस्थित होते. कॅम्पचे उद्‌घाटन प्राचार्य डॉ.व्ही.एस. श्रीवास्तव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार थोरात म्हणाले की,

एन.सी.सी. हे करिअर बनवण्यासाठी उत्तम व्यासपीठ आहे. अशा प्रशिक्षण शिबिरांमुळे आत्मविश्वास निर्माण करुन स्पर्धा परीक्षेतही यश संपादन करता येते. प्राचार्य डॉ.श्रीवास्तव यांनी छात्रसैनिकांना एकता व अनुशासनाचा ध्येयमंत्र दिला. नंदुरबार तालुका विधायक समितीचे समन्वयक डॉ.एम.एस.रघुवंशी यांनी छात्रसैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी बेस्ट कॅडेट इन ड्रिलसाठी पारितोषिकांची घोषणा केली. उपप्राचार्य डॉ.आर.आर. कासार, डॉ.एम.जे. रघुवंशी, प्रा.एन.जे. सोमाणी यांनीही मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणादरम्यान ४९ महाराष्ट्र बटालियनचे सुभेदार राजेंद्रसिंग व हवालदार उमेश भगत प्रशिक्षण देणार आहेत. प्रशिक्षणात वेपन ट्रेनिंग, मॅप रिडींग, राष्ट्रीय एकात्मता, हेल्थ सिक्युरिटी, सायबर लॉ अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. यात डॉ.दास, डॉ.कदम, प्राचार्य डॉ.एन.डी. चौधरी, प्रा.धगधगे, लेफ्ट.चौधरी, फर्स्ट ऑफिसर विलास वाघ व राहुल पाटील मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमासाठी डॉ.अमोल भुयार, डॉ. दिनेश देवरे, डॉ.माधव वाघमारे व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. सूत्रसंचलन एन.सी.सी. अधिकारी लेफ्ट. डॉ. विजय चौधरी तर आभार फर्स्ट ऑफिसर विलास वाघ यांनी मानले.

Web Title: G.T. Inauguration of NCC Camp at Patil College