नवापुरात वाढत्या कोरोना रूग्णांमुळे वाढले चिंतेचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 13:04 IST2020-08-03T13:04:18+5:302020-08-03T13:04:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरातील देवळफळी येथील ५९ वर्षीय महिला व ४१ वर्षीय पुरूष तर जनता पार्क येथील ...

नवापुरात वाढत्या कोरोना रूग्णांमुळे वाढले चिंतेचे सावट
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : शहरातील देवळफळी येथील ५९ वर्षीय महिला व ४१ वर्षीय पुरूष तर जनता पार्क येथील ५४ वर्षीय पुरूष, असे तिघांना दोन दिवसात कोरोनाची लागण झाली आहे तर शहरातील दोघांना तपासणीसाठी नेण्यात आले आहे.
गेल्या दोन दिवसात तीन रूग्णांची वाढ पाहता तालुक्याची कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण संख्या २९ झाली आहे. जनता पार्क परिसरात या आधीही कोरोनाचा संसर्ग झालेले रूग्ण आढळून आले होते. गल्ली क्रमांक चारमधून ५४ वर्षीय पुरूषास आता कोरोनाची लागण झाली आहे तर गल्ली क्रमांक एकमधून एकास तपासणीसाठी नेण्यात आल्याची माहिती आहे. देवळफळीतील दाट वसाहतीतून ५९ वर्षीय महिला व ४१ वर्षीय पुरूष शनिवारी पॉझिटीव्ह आढळून आले होते. शहरातील जनता पार्क व देवळफळीचा तो भाग प्रशासनाने सील करून कंटेनमेंट झोन जाहीर केला आहे. पालिकेकडून त्या भागात औषध फवारणी करण्यात आली तर आरोग्य विभागाकडून थर्मल स्कॅनिंग सुरू करण्यात आले आहे.
सध्या पावसाळा असूनही पाऊस पडत नसल्याने एकीकडे उकाड्याने नागरीक हैराण होत आहेत तर दुसरीकडे डासांचा उपद्रव वाढत आहेत. टायफाईड व मलेरियाचे रूग्ण संख्या शहरात वाढत आहेत. एकीकडे कोरोनाची भिती तर दुसरीकडे सर्दी-खोकला व तापाचा त्रास या विवंचनेत शहरवासी सापडले आहेत.
नागरिकांनी शासन नियम व सूचनांचे पालन करा असे आवाहन तहसीलदार सुनीता जºहाड, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शशिकांत वसावे, पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी कळविले आहे.