गटसंसाधन केंद्राच्या कंत्राटी कर्मचा:यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 12:07 IST2019-09-17T12:07:09+5:302019-09-17T12:07:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गट संसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता) कंत्राटी कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हा परिषद आवारात एक दिवसीय ...

गटसंसाधन केंद्राच्या कंत्राटी कर्मचा:यांचे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गट संसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता) कंत्राटी कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हा परिषद आवारात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. प्रसंगी संघटनेने विविध मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी विनयकुमार गौडा यांना दिले.
निवेदनात, जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समिती अंतर्गत पाणी व स्वच्छता बाबतची कामे करण्यासाठी गट संसाधन केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. केंद्रांतर्गत केंद्र व राज्य शासनाचे स्वच्छ भारत मिशन, पाणी गुणवत्ता सनियंत्रण कार्यक्रम आणि पाणी व स्वच्छता विषयक योजना राबवण्यात येतात़ ग्रामीण भागात कक्षातील समन्वयक व समुह समन्वयक काम करतात. परंतु शासनाकडून त्यांना अल्प मानधन देण्यात येत़े यामुळे मानधनवाढ करुन शासकीय सेवेत समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आह़े प्रसंगी जिल्हाध्यक्ष दारासिंग वसावे, यशवंत गांगुर्डे, युवराज चौधरी, अरुण शेंडे, प्रितेश्वर पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होत़े