शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

भागवत सप्ताहात सामूहिक विवाह, पाच जोडप्यांचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 08:27 IST

तळोदा तालुक्यातील धानोरा येथे श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

नंदुरबार : तळोदा तालुक्यातील धानोरा येथे श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाच्या समारोपात समाजातील पाच गरीब जोडप्यांचा सामुहिक विवाह लावण्यात आला. गावातील भागवत सेवा समिती व यजमानांच्या अशा आदर्श कार्याचे कौतुक केले जात आहे.तळोदा तालुक्यातील धानोरा येथील दोडे गुजर समाजातील भागवत सेवा समिती व यजमान तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय रमेश चौधरी यांनी ७ मार्च २०१९ पासून श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन केले होते. या सप्ताहाचा समारोप गुरुवारी करण्यात आला. याप्रसंगी समाजातील गरीब कुटुंबातील पाच जोडप्यांचे शुभमंगल समाजाच्या चालीरितीनुसार, पुरोहितांच्या मंत्रोपच्चाराने लावण्यात आले. कार्यक्रमास खासदार डॉ.हीना गावीत, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार उदेसिंग पाडवी, माजीमंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी, सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, डॉ.शशिकांत वाणी, नगराध्यक्ष अजय परदेशी, दोडे गुजर समाजाचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र राजपूत, व्यंकट पाटील, कृष्णदास पाटील, रघुवीर चौधरी, रतिलाल पाटील, तुंबडू पाटील, मोतीराम पाटील, हरकलाल पाटील, जगन चौधरी, गजानन पाटील, अरुण पाटील, गोपाळ चौधरी, विनोद चौधरी आदींसह समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमास खासदार डॉ.गावीत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, भागवत सप्ताहातच समितीने समाजातील गरीब जोडप्याचे सामूहिक विवाह आयोजित केल्याने निश्चितच कौतुकास्पद कार्य आहे. त्यामुळे त्यांनी आयोजकांचे कौतुक केले. अशा प्रकारचे सामूहिक विवाह सोहळे मोठ्या प्रमाणात साजरे करण्याचे आवाहनही केले. या वेळी आमदार डॉ.गावीत, आमदार पाडवी यांनीही मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक पोलीस पाटील बापू पाटील यांनी केले. सूत्रसंचालन शुभम चौधरी तर आभार संजय रमेश चौधरी यांनी मानले. कथेचे निरूपन खगेंद्र महाराज ब्राह्मणपुरीकर यांनी केले. सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.समाजातील दात्यांनी वधू-वरांना केली मदतरतिलाल पाटील, मोतीराम पाटील, रघुवीर चौधरी, दगडू पाटील, कृष्णदास पाटील, आनंदा पाटील, दशरथ पाटील, अश्विन चौधरी, संतोष पाटील, लक्ष्मण पाटील, संजय पाटील, धरमदास पाटील, तुमडू पाटील, गजानन पाटील, जगन चौधरी, हरकलाल पाटील, विनोद चौधरी, गोपाळ चौधरी, राजेंद्र चौधरी, मुकेश पाटील, अरूण पाटील, सोमेश पाटील, कुणाल पाटील, अर्जुन पाटील, आंबालाल पाटील, कमलेश पाटील आदी समाज बांधवांनी वधू-वरांना वस्तू स्वरूपात मदत केली. या सर्व दात्यांचा गौरव करण्यात आला होता. समाजातील कुकरमुंडा येथील महेंद्र पाटील यांचाही गौरव करण्यात आला.

टॅग्स :marriageलग्न