चर्मकार समाजातील 18 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 12:47 IST2019-05-27T12:47:29+5:302019-05-27T12:47:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चर्मकार समाजाच्या सामुहिक विवाह सोहळ्यात 18 जोडप्यांचे शुभमंगल झाले. जोडप्यांना विविध संसारोपयोगी वस्तू देण्यात ...

चर्मकार समाजातील 18 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : चर्मकार समाजाच्या सामुहिक विवाह सोहळ्यात 18 जोडप्यांचे शुभमंगल झाले. जोडप्यांना विविध संसारोपयोगी वस्तू देण्यात आल्या. महाराष्ट्रासह गुजरात व मध्यप्रदेशातील जोडपे देखील यात सहभागी झाले होते.
शहरातील अभिनव विद्यालयाच्या प्रांगणात या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या महिनाभरापासून त्यासाठीच्या नियोजनासाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरातमध्ये जावून आयोजक समाज बांधवांनी जनजागृती केली. त्याचा चांगला परिणाम होऊन यंदा 18 जोडपे सहभागी झाले.
सहभागी वरांची सकाळी वाजतगाजत वरमिरवणूक काढण्यात आली. जाती रिवाजाप्रमाणे यावेळी सर्व सोपस्कार पार पाडण्यात आले.
आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार शिरिष चौधरी, पोलीस उपअधीक्षक रमेश पवार, समाज कल्याण अधिकारी राकेश महाजन, नगरसेवक प्रमोद शेवाळे, चारूदत्त कळवणकर, ईश्वर चौधरी, राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत, उद्योगपती मनोज रघुवंशी, डॉ.रवींद्र चौधरी, पोलीस निरिक्षक नंदवाळकर, पोलीस उपनिरिक्षक आनंदा पाटील आदी उपस्थित होते. मान्यवरांनी समाजाच्या या उपक्रमाचे कौतूक केले. अशा प्रकारचे विवाह सोहळे प्रत्येक समाजात आयोजित करून वेळ, पैसा यांची बचत करावी. महागाईच्या जमान्यात या सोहळ्याची आवश्यकता असून यात कुणीही कमीपणा न मानता समाज विकासासाठी अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
या वेळी धडगाव येथील चिंधू चव्हाण व धुळे येथील छगण ठाकरे यांना समाज भूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
चर्मकार समाज सामुहिक विवाह आयोजन समितीचे अध्यक्ष दगडू अजिंठे, कार्याध्यक्ष दिलीप तिजवीज यांच्यासह संयोजन समितीतर्फे मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचलन रमेश मलखेडे व चव्हाण यांनी केले. यशस्वीतेसाठी चतुर अहिरे, मनोज समशेर, हंसराज अहिरे, महेंद्र चव्हाण, ईश्वर सोनवणे, विनोद अहिरे, विजय अहिरे, मोहन अहिरे, अजरून अहिरे, संतोष अहिरे, राकेश कंढरे व समाज बांधवांनी परिश्रम घेतले.