परसबागेमुळे मिळतोय ‘अमृत आहार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 13:07 IST2019-09-06T13:07:20+5:302019-09-06T13:07:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या प्रामाणिक प्रय}ामुळे जिल्ह्यातील अनेक अंगणवाडय़ांच्या परिसरात परसबाग लावण्यात आली ...

Groundnut provides for 'nectar diet' | परसबागेमुळे मिळतोय ‘अमृत आहार’

परसबागेमुळे मिळतोय ‘अमृत आहार’

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या प्रामाणिक प्रय}ामुळे जिल्ह्यातील अनेक अंगणवाडय़ांच्या परिसरात परसबाग लावण्यात आली आहे. बालक तसेच स्तनदा व गर्भवती मातांना सकस आहार देण्यासाठी परसबागेतून ताज्या आणि पौष्टीक भाज्या उपलब्ध होत आहेत.
नंदुरबार तालुक्यातील बालआमराई येथील अंगणवाडी सेविका संगीता कोकणी आणि मदतनीस ललीता कोकणी तसेच ढेकवद येथील अंगणवाडी सेविका लता वळवी आणि मदतनीस विमल सौंदाणकर यांनी परसबागेचा उपक्रम गेल्या दोन वषार्पासून राबवत आहेत. त्यांनी परसबागेत दुधी, गिलके, दोडके, भेंडी, शेवगा आदी भाज्या लावल्या आहेत. सुरुवातीला मेथी आणि पालकही लावण्यात आले होते. परंतु मुसळधार पावसामुळे दोन्ही भाज्या खराब झाल्यावरही हार न मानता या महिला कर्मचा:यांनी  नव्याने वेगळ्या भाज्यांची लागवड केली. आता दररोज दोन ते तीन किलो भाज्या या परसबागेतून उपलब्ध होतात.
अंगणवाडीत शिजविल्या जाणा:या अमृत आहारासाठी साधारण 750 ग्रॅम भाज्यांची आवश्यकता असते. शिवाय बचत गटामार्फत मुलांना देण्यात येणा:या पौष्टीक आहारातदेखील या भाज्यांचा उपयोग होत असल्याने अन्नाची गुणवत्ता वाढते आहे. अॅनिमियापासून मातांना दूर ठेवण्यासाठी हा आहार उपयुक्त ठरणार आहे. साधारण दिवाळीर्पयत पावसाच्या पाण्यावर भाज्या घेतल्या जातात. त्यानंतर पाण्याच्या उपलब्धतेनुसार भाज्या लावण्यात येतात. या महिला स्वत: शेतकरी कुटुंबातील असल्याने बियाणे सहज उपलब्ध होत आहे. अंगणवाडीत शिजविल्या जाणा:या उसळीत  दुधीचा उपयोग केला जातो. तर वरणात शेवग्याच्या पाल्याचा उपयोग केला जातो. इतरही  हिरव्या भाज्यांचा अन्नात उपयोग होतो. हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करण्याबाबत जागृती करण्यासाठी अंगणवाडीत तयार केलेल्या अक्षयपात्रात परसबागेतील भाज्या ठेवण्यात येतात. नंदुरबार प्रकल्पांतर्गत सुमारे 100 अंगणवाडय़ांमध्ये जागेच्या उपलब्धतेनुसार हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात इतरत्रही अंगणवाडय़ांच्या माध्यमातून पोषण आहार देण्याचा प्रय} होत आहे. या उपक्रमामुळे पोषण अभियानाला गती मिळाली आहे.
 

Web Title: Groundnut provides for 'nectar diet'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.